हसमुखच्या मर्सिडीजच्या अपघातात एका निरपराध महिलेचा मृत्य झाला होता; नंतर जामिनावर सुटला

ठाणे: कालच ठाणे शहरातील गाजलेलं प्रकरण म्हणजे हसमुख शहा या गुजराती व्यक्तीला मनसेने दिलेला चोप. राहुल पैठणकर नावाच्या व्यक्तीला शुल्लक कारणावरून हसमुख शाहा आणि त्याच्या मुलाने अत्यंत वाईट पद्धतीने मारहाण केली होती. त्यानंतर तब्बल ५ दिवस त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने प्रकरण मनसेकडे गेले होते. दरम्यान, राहुल पैठणकर यांनी दिलेल्या माहितीवरून मनसेने हसमुख शाहा याला शोधून काढला आणि चोप देत जाहीर माफी मागायला लावली होते.
मात्र शुल्लक कारणावरून राहुल पैठणकर यांना मारहाण करणारा हसमुख शहा हा मुळातच निर्दयी मनाचा असल्याचं अजून एक उदाहरण समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी त्याने घोडबंदर रोडवर निष्काळजीपणे गाडी चालवताना दोघांना जखमी केलं होतं. दरम्यान रिक्षाला ठोकल्यानंतर पळून जाण्याच्या नादात त्याने बाजूला उभ्या असलेल्या वंदना भगत या महिलेला स्वतःच्या मर्सिडीजने उडवलं आणि नंतर इस्पितळात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.
त्यानंतर रिक्षाचालकाच्या तक्रारीनंतर हसमुख शाहा विरुद्ध कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटकही केली होती. मात्र नंतर तो जामिनावर सुटला होता. बांधकाम व्यावसायिक असलेला हसमुख शहा अत्यंत उद्दाम स्वभावाचा असल्याचं अनेकांनी सांगितलं. त्याच्या एकूण वागण्यात नेहमीच उन्माद जाणवतो असं अनेकांनी अनुभवलं असून, सध्या मनसेच्या चोप सत्कारानंतर तरी त्याचं डोकं ठिकाणावर येईल असं आजू बाजूच्या लोकांनी मत व्यक्त केलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं