महालक्ष्मी एक्सप्रेसमधल्या ५०० प्रवाशांना वाचवण्यात यश

ठाणे : महालक्ष्मी एक्सप्रेसमधील प्रवाशांच्या मदतीला नौदल, हवाईदल देखील कार्यरत करण्यात आलं होतं. मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस शुक्रवारी रात्रीपासून वांगणी येथे अडकली आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी रुळावर साठलं आहे. एक्सप्रेसमध्ये ७०० प्रवासी अडकले होते. यापैकी ५०० प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे.
प्रवाशांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ च्या चार तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सोबतच नौदल आणि हवाईदल देखील बचावकार्यासाठी दाखल झालं आहे. घटनास्थळी नौदलाची सात बचाव पथके दाखल झाली असून यामध्ये तीन गोताखोरांची पथके आहेत. तसंच दोन हवाई दलाचे हेलिकॉप्टर मदतीसाठी घटनास्थळी दाखल आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एका हेलिकॉप्टर सोबत नौदलाच्या गोताखोरांची टीम घटनास्थळी पाठवण्यात आली होती.
मुंबईसह इतर भागांमध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईची रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अनेक स्थानकांवर पाणी भरलं आहे. यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेती. गेल्या २४ तासांत १५०-१८० मिलिमीटर पर्यंत पावसाची नोंद करण्यात आली आहे. येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. त्यामुळे गरज असेल तरच बाहेर पडा असं सांगण्यात आलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं