षंढ असण्यापेक्षा गुंड बरे! हितेंद्र ठाकूर यांचा बाळासाहेबांच्या शब्दात उद्धव ठाकरेंना टोला

वसई : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दौऱ्यावर आलेले उद्धव ठाकरे यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांना लक्ष केलं आहे. वसईतील गुंडगिरी मोडून काढू, असे सांगत हितेंद्र ठाकूर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हितेंद्र ठाकूर यांनी खासकरून स्वर्गीय. बाळासाहेबांच्या शैलीतच खरपूस समाचार घेतला आहे.
उद्धव ठाकरेंना प्रतिउत्तर देताना हितेंद्र ठाकूर म्हणाले की “षंढ असण्यापेक्षा गुंड बरे” अशा शब्दात जिव्हारी लागणाऱ्या भाषेत उत्तर दिल आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी प्रचारासाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांनी वसईतील बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं होत. त्यामुळे आक्रमक झालेल्या हितेंद्र ठाकूर यांनी देखील पलटवार केला मात्र तो खास बाळासाहेबांच्या शैलीत आणि शब्दांमध्ये.
बाळासाहेब नेहमीच बोलायचे की ‘माझे शिवसैनिक गुंड असलेले चालतील, पण षंढ नको’. त्याच शब्दांचा आधार घेत बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणेच आम्ही गुंड आहोत, षंढ नाही, असे शब्द प्रयोग करत उद्धव ठाकरेंना सणसणीत चपराक दिली आहे. पुढे ते असं देखील म्हणाले की ‘आता षंढ कोण आहे हे सगळ्यांनी पाहिले आहे, अशा शब्दात त्यांनी टीका केली.
काही दिवसांपासून भाजप सांगेल त्याप्रमाणे उद्धव ठाकरे वागत आहेत, तसेच भाजपच्या हो ला हो बोलण्या व्यतिरिक्त ते दुसरं काहीच करताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे भाजप विरुद्ध रोज डरकाळ्या फोडणारे उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुका जाहीर होताच एकदम नरमल्याने त्यांचे सर्वच थरातून हसू झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचाच अचूक धागा पकडत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं