नवी मुंबई: शिवसेनेतील अंतर्गत वादातून स्वकीयांना जीवे मारण्याच्या धमक्या

नवी मुंबई: विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना अनेक शहरांमध्ये पक्षातील अंतर्गत वाद टोकाला जाताना दिसत आहेत. त्यात नवी मुंबईमध्ये शिवसेनेच्या वाट्याला एकही मतदारसंघ आलेला नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या विरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात सेनेच्याच पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे.
काल संध्याकाळी ऐरोली येथे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी पक्षांतर्गत राजकीय बैठक बोलवली होती. मात्र सदर बैठक शिवसेनेची अधिकृत नसल्याचे इतर पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. त्यावरून शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे यांनी त्या बैठकीच्या बाबतीत स्थानिकांना माहिती देण्यासाठी स्वतः मेसेज तयार करून ते शिवसेनेच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर व्हायरल केले होते. मात्र त्यानंतर संतापलेल्या विजय चौगुले यांनी त्याचा जाब विचारण्यासाठी प्रवीण म्हात्रे यांना फोन केला होता. त्यादरम्यान दोघांमध्ये वादविवाद वाढत शाब्दिक चकमक उडाली आणि त्यानंतर संतापलेल्या विजय चौगुले प्रवीण म्हात्रे यांनी थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार म्हात्रे यांनी कोपरखैरणे पोलीस स्थानकात केली आहे.
पोलिसांकडे तक्रार केली असता विजय चौगुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यासंदर्भात विजय चौगुले यांच्याशी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, तसेच प्रवीण म्हात्रे यांनी केलेला दावा खोडून देखील काढला नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं