गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर हल्ले झाले तेव्हा मनोज तिवारी कोणत्या बिळात लपलेला? विनय दुबे

कल्याण : गुजरातमधील एका घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवरून संतापाच वातावरण झाल्यानंतर हजारो परप्रांतीयांवर हल्ले करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यानंतर हजारो उत्तर भारतीयांनी रातोरात गुजरातमधून पलायन केलं होतं. मात्र या संपूर्ण घटनेनंतर भारतीय जनता पक्षातील आणि काँग्रेसमधील सर्व उत्तर भारतीय नेते अज्ञातवासात गेल्याचे दिसले होते.
महाराष्ट्रात आगपाखड करणारे सर्वांच्या सर्व उत्तर भारतीय नेते मूग गिळून शांत बसल्याचे महाराष्ट्राने पहिले होते. त्यात विषय थेट गुजरातशी संबंधित असल्याने भाजपमधील उत्तर भारतीय नेत्यांनी तोंड न उघडणारे नेते सध्या महाराष्ट्र विधानसभेत प्रचारासाठी प्रकटले असून, स्थानिक नेत्यांना धडा शिकविण्याचे भाष्य करत आहेत.
त्यात दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे गुजरातमधील ज्या आमदार अल्पेश ठाकोर याने उत्तर भारतीयांवर हल्ले घडवून आणले होते त्यांना गोड पेढा भरवत भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी भाजपात जाहीर प्रवेश दिला आहे. मात्र आजही मनोज तिवारी आणि इतर अन्य भाजप नेते तोंड उघडण्यास धजावत आहेत. त्यामुळे उत्तर भारतीय नेत्यांचे त्यांच्या समाजाप्रती असलेले बेगडी प्रेम पाहण्यास मिळत आहे.
महाराष्ट्रात प्रचारासाठी भाजपचे खासदार मनोज तिवारी प्रकटले असून, परप्रांतियांना मारहाण करणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवणार, अशा शब्दात भोजपुरी अभिनेते आणि भाजप खासदार मनोज तिवारी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अप्रत्यक्षरीत्या टोला लगावला आहे. कल्याणमध्ये आयोजित केलेल्या सभेत तिवारींनी उत्तर भारतीय मतदारांना भोजपुरीतूनच संबोधित केलं.
‘मुंबई, ठाणे, वाशी, ऐरोलीमध्ये काही जणांना धरुन-धरुन मारहाण केली जाते. कारण ते उत्तर भारतीय आहेत. मी तर हिरो आहे. चित्रपट करायचो, गाणी गायचो. मात्र अचानक माझ्यामध्ये नेता संचारला. मी ठरवलं विरोध करायचा. रस्त्यावर उतरलो, विरोध केला आणि त्यानंतर माझा विजय झाला’ असं मनोज तिवारी म्हणाले.
‘शिवसेनेचे लोक आमच्यासोबत आहेत, पण शिवसेनेतून वेगळं होऊन बाहेर पडलेले जे लोक आहेत, मला त्यांचं नाव घेण्याची गरज नाही. सगळ्यांना माहित आहे ते कोण आहेत ते. प्रांताच्या नावाखाली जर ते आमचे ठेले आणि गाड्या उधळणार असतील, तर त्यांना धडा शिकवणार’ अशा शब्दात मनोज तिवारींनी राज ठाकरेंना निवडणुकीपुरतीचा पोकळ इशारा दिला आहे.
दरम्यान, गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर हल्ले होत होते तेव्हा कोणत्या बिळात लपून बसला होता, अल्पेश ठाकोरबाबत तुम्ही मौन बाळगून होता. आज अल्पेशला पक्षात घेऊन सन्मान केला. राज ठाकरेंनी उत्तर भारतीय महापंचायतीच्या कार्यक्रमात येऊन भूमिका स्पष्ट केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनेक उत्तर भारतीयांना मदत केली, एका आईला तिचं बाळ परत मिळवून देण्यासाठी अविनाश जाधव यांनी पुढाकार घेतला, मनसेची भूमिका महाराष्ट्र हिताची आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढे पैसे मिळतात तेवढचं बोलावं असा इशारा उत्तर भारतीय महापंचायतीचे अध्यक्ष विनय दुबे यांनी भाजप खासदार मनोज तिवारी यांना दिला आहे.
याबाबत बोलताना विनय दुबे म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासासाठी मनसे बोलत असते, आज मुंबई शांत असताना अशाप्रकारे वक्तव्य करुन वातावरण खराब का करताय? राज ठाकरेंबद्दल तुम्हाला इतका राग असेल तर सुरक्षा सोडून एकदा फिरून दाखवा, तुमच्या अशा वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण बिघडवलं जात आहे. भाजपाने काय काम केले हे सांगावं असं त्यांनी सांगितले.
तसेच निवडणुकीत आला असेल तर मतं मागा, भाजपाने एवढचं काम उत्तर प्रदेशात केले असतं तर लोकांना मुंबईत येण्याची गरज नसती पडली. तुम्हाला कोणी बूट फेकून मारलं किंवा थप्पड मारली तर आमचाही अपमान होईल. पण जे काम आहे तेच कराव, जनता आणि राजकारणात रस असेल म्हणून काहीही वक्तव्य करुन दोन समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करु नका, भाजपाचे सुरेश धस यांनी बिहारी लोकांबद्दल केलेले वक्तव्य त्याला जाब विचारा, गुजरातमधून उत्तर भारतीयांना हाकलवलं त्या अल्पेश ठाकोरला जाब विचारा असाही टोला विनय दुबे यांनी लगावला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं