ना खाऊंगा ना खाणे दूंगा! लाचखोर भाजप नगरसेविकेला कोर्टाकडून ५ वर्षांचा कारावास

मीरारोड: मीरा भाईंदर महापालिकेतील भारतीय जनता पक्षाची लाचखोर नगरसेविका वर्षा गिरीधर भानुशाली हिला लाच प्रकरणी ठाणे कोर्टाने ५ वर्ष कैद आणि ५ लाख दंडाची शिक्षा ठोठावली आहे. भाजप नगरसेविका वर्षा भानुशाली लाचप्रकारणी ५ वर्षांचा कारावास आणि ५ लाख दंड अशी शिक्षा असून दंड न भरल्यास आणखी ६ महिन्याचा कारावास भोगावा लागेल.
भाईंदर पूर्वेकडील रेल्वे फाटकाजवळील विनोकेम्प इंडस्ट्रियल एस्टेटमध्ये राधा हर्षल पटेल यांचे १९७८ पासून पाच गाळे आहेत. त्यात बफिंगचे काम चालते. गाळा दुरु स्तीसाठी राधा पटेल यांनी २३ ऑगस्ट २०१३ ला महापालिकेत अर्ज केला होता. त्यानुसार महिन्यापूर्वी त्यांना परवानगी देण्यात आली होती.
परंतु ही परवानगी दुरु स्तीसाठी आहे, उंची वाढविण्यासाठी नाही,असे सांगून भानुशाली यांनी त्यांचे काम करण्यासाठी पैशांची मागणी केली होती. त्यावरून राधा पटेल यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याआधारे पोलीस निरीक्षक अशोक साळवे यांनी भानुशाली यांना अटक केली होती.
Web Title: Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator Varsha Bhanushali sentenced Five Years Imprisonment from Court
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं