राज भाग्यवान नेते; नगरसेवकही होणार नाही हे माहीत असताना कार्यकर्ते नेत्यासाठी जीव ओवाळतात

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोहिनूर मिल व्यवहारप्रकरणी ईडीने नोटीस पाठवल्याने मनसैनिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. राज ठाकरेंना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याने ठाण्यात एका मनसैनिकाने पेटवून घेत आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. प्रवीण चौगुले असे या आत्महत्या करणाऱ्या मनसैनिकाचे नाव आहे. त्यावरून आता एनसीपीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, खरं तर आत्महत्या करणं चुकीचे आहे, पण अशा परिस्थितीत काही जण राजकारणात निष्ठेची विष्ठा करताना दिसताहेत. ४०-५० वर्षे ज्यांची खानदानं सत्तेत होती ते सत्तेच्या लाचारीसाठी इथे तिथे जाताना दिसत आहेत.
पण कळव्यातील प्रवीण चौगुलेने राज ठाकरे यांच्या निष्ठेपायी आत्महत्या केली, कळव्यातील प्रवीण चौगुले हा कार्यकर्ता केवळ राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्यानं अस्वस्थ होता. माझ्या नेत्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे, असे कुठेच दिसत नाही. दररोज सकाळी दुर्बिण लावून शोधावे लागते कुठले कार्यकर्ते कुठे गेलेत. सत्ता येणार नाही, नगरसेवक होणार नाही हे माहीत असतानाही नेत्याच्या प्रेमापोटी जीव देणं हे काही सोपं नाही. राज ठाकरेंसारख्या भाग्यवान नेत्याला सलाम, हे भाग्य फार लोकांच्या नशिबी येत नाही. नेत्यासाठी कार्यकर्ता प्राण पणाला लावेल हे आजच्या काळात काही वेगळंच वाटतं, असंही आव्हाड म्हणाले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मुंबईतील ईडी विभागीय कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, उद्या चौकशी नक्की किती वेळ होणार हे निश्चित सांगता येत नसलं तरी बाहेरील परिस्थिती बिघडणार नाही यासाठी पोलीस प्रशासन कामाला लागलं आहे. काल पासूनच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्थानिक पोलिसांनी नोटीस बजावल्या होत्या.
दरम्यान, स्वतः राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आणि ईडी कार्यालयाबाहेर न जमण्याचे आवाहन केलं असलं पोलीस यंत्रणा कोणताही धोका पत्करण्याची मनस्थितीत नसल्याचं दिसत आहे. आज मुंबई आणि आजूबाजूच्या शहरातील बसेसला देखील कवच लावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण ईडी कार्यालयाला मुंबई पोलिसांनी गराडा घातला असून संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली आहे.
उद्या कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण शहरात चोख पोलीस बंदोबस्त आज रात्रीपासूनच दिला जाणार आहे. दरम्यान, काही महत्वाच्या मनसे पदाधिकाऱ्यांवर देखील पोलिसांचं लक्ष असून उद्या त्यांना पुन्हा समज दिली जाऊ शकते. मात्र मनसे कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा संपूर्ण यंत्रणेला माहित असून राज ठाकरे यांच्यासाठी कार्यकर्ते कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि त्यामुळे पोलीस प्रशासन कोणतीही जोखीम उचलण्याच्या मनस्थितीत नाहीत. सरकार हे सूडबुद्धीने करत असल्याचा आरोप मनसेने केला असल्याने भाजप कार्यालयांना देखील अधिक सुरक्षा पुरवण्यात आली असल्याचं वृत्त आहे. एकूणच आज मनसेचा एकही आमदार किंवा खासदार नसला तरी दरारा मात्र अगदी बाळासाहेबांप्रमाणे असल्याचं नजरेस पडत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं