मनसे इफेक्ट! कोपर रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाला मंजुरी; १८ला निविदा प्रसिद्ध होणार

कल्याण: एका बाजूला राज्यातील सत्तास्थापनेचा गोंधळ तब्बल ३ आठवडे सलग सुरु असताना, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्या बाबतीत मात्र एक अपवादात्मक प्रकार पाहायला मिळत होते. एका बाजूला अपक्षांपासून एक-एक आमदाराच्या समर्थनाचा भाव वाढलेला असताना मनसे आमदार राजू पाटील यासर्व राजकीय बाजाराकडे दुर्लक्ष करत जोरदारपणे कल्याण-डोंबिवली शहरातील मागील अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी सर्वच पातळीवरील प्रशासकीय पाठपुरावा करू लागले आहेत.
त्यानुसार त्यांनी डोंबिवलीतील कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचा आराखडा रेल्वेकडे सादर केला आहे. या आराखड्याला दोन दिवसात मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले होतं. कोपर रेल्वे उड्डाणपूल, लोकग्रामचा पादचारीपूल, पत्रीपूल आणि डोंबिवली स्थानकातील पादचारीपूल यासंदर्भात कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मध्य रेल्वेचे एडीएमआर एस.आर.कक्कड यांची भेट घेतली होती.
कोपर रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने रेल्वेच्या आदेशानुसार महापालिकेने बंद केला. त्याच्या दुरुस्तीचा आराखडा १७ ऑक्टोबरला महापालिकेने रेल्वेकडे पाठविला. मात्र, रेल्वेकडून त्याला मंजुरी देण्यात दिरंगाई होत असल्याने पाटील यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी कोपर पुलाच्या दुरुस्तीचा आराखडा मंजूर केला जाईल असं आश्वासन दिल आहे. आमदार राजू पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार सदर विषयाला अनुसरून महापालिकेने तातडीने पुलाच्या दुरुस्तीचे प्राकलन तयार केले आहे. त्यानुसार, दुरुस्तीच्या कामासाठी १८ नोव्हेंबरला निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. निविदा प्राप्त होऊन निविदेस तातडीने मंजुरी देऊन पुलाच्या दुरुस्तीचे काम प्रत्यक्ष सुरु केले जाईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे येथे मनसेचा आमदार निवडून येताच कल्याण-डोंबिवलीचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे असंच म्हणावं लागेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं