मनसे शेतकरी महामोर्चा! सरकारचा जीआर; शेतकऱ्यांनो शेतमाल आता थेट पालिका-नगरपालिका क्षेत्रात विका

ठाणे : मागील महिन्यात ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत एका आंबे विक्रेत्या शेतकऱ्याचा स्टॉल स्थानिक भाजपने हटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या समर्थनार्थ ठाण्यातील मनसे कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नैतृत्वाखाली आक्रमकपणे रस्त्यावर उतरले आणि स्थानिक भाजप नगरसेवकांपासून सर्वानाच चोप देण्यात आला. मात्र त्यानंतर विषय एवढ्यावरच न थांबता मनसेने अजून एक लोकशाही मार्गाने पवित्रा घेत १७ मे रोजी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आणि त्यांना नगरपालिका तसेच पालिका हद्दीत थेट मालाची विक्री करता यावी यासाठी सरकारवर कायद्यात तरदूत करण्यासाठी दबाव आणण्याच्या उद्देशाने शेतकरी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान १७ मे रोजी मनसेने ठाण्यात शेतकरी हिताय महामोर्चा काढला, ज्याला आसपासच्या गावातील अनेक शेतकऱ्यांनी, स्थानिक लोकांनी आणि मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्याप्रमाणावर उपस्थिती दर्शवली होते. त्यानंतर सरकारवर दबाव अधिकच वाढला होता आणि त्यात ठाण्यातील राड्यात स्वतः भाजपचे स्थानिक प्रतिनिधी सामील झाल्याने भाजप सरकार शेतकरी विरोधात असल्याचा संदेश गेला होता.
अखेर मनसेच्या शेतकरी महामोर्च्यांच्या दबावामुळे राज्य सरकारला अधिकृतरित्या जीआर काढणं भाग पडलं असून, त्यातून थेट राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. त्यानुसार आता राज्यातील शेतकरी नगरपालिका आणि पालिका हद्दीत थेट त्याच्या शेतमालाची विक्री करू शकतील असं जीआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. मात्र यासाठी मनसेच्या राज्यातील सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी असा संदेश देखील अविनाश जाधव यांनी दिला आहे. कारण योजना असून देखील त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत आणि जर शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे जाणार असतील तर त्यासाठी सदर विषय कार्यकर्त्यांनी राज्यभर पोहोचवावा असं म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये शेतकऱ्यांना थेट शेतमाल विकताना आता कुणीही त्रास देऊ शकणार नाही; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ह्यासाठी आग्रह धरला, आंदोलन पुकारले, मोर्चा काढला आणि अखेर हि शेतकरी हिताची ‘मनसे’ मागणी सरकारला मान्य करावीच लागली असं त्यांनी म्हटलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं