महत्वाच्या बातम्या
-
शिंदेंना उत्तर भारतीयांची अनधिकृत दुकानं फोडल्याचे ज्ञात, पण मराठी माणसाची डोकी फोडल्याचा विसर?
काळाच्या ओघात शिवसेना मराठी माणूस हा शिवसेनेसाठी केवळ मतांसाठी गृहीत धरलेला पारंपरिक मतदार झाला आहे. शिवसेनेचे ठाण्यातील आमदार तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उत्तर भारतीय समाजाचे गोडवे गाण्यास सुरवात केली आहे. भाषणात मराठी माणसाचा एकही उच्चार न करता, त्यांनी केवळ उत्तर भारतीयांचे आणि शिवसेनेच्या अतूट नात्याचे दाखले नवी मुंबईतील आयोजित कार्यक्रमात दिले आहेत. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेने कधीही उत्तर भारतीय नागरिकांना त्रास दिला नाही.
6 वर्षांपूर्वी -
ठाण्यात अनेक नगरसेवक उत्तर भारतीय, आम्ही युपी'वाल्यांच्या पाठीशी खंबीर: एकनाथ शिंदे
शिवसेनेचे ठाण्यातील आमदार तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उत्तर भारतीय समाजाचे गोडवे गाण्यास सुरवात केली आहे. मराठी माणसासाठी एकही उच्चार न करता त्यांनी केवळ उत्तर भारतीयांचे आणि शिवसेनेच्या अतूट नात्याचे दाखले नवी मुंबईतील आयोजित कार्यक्रमात दिले आहेत. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेने कधीही उत्तर भारतीय नागरिकांना त्रास दिला नाही.
6 वर्षांपूर्वी -
पालघर भूकंप: एनडीआरएफची पथकं दाखल, स्थानिकांमध्ये जनजागृती करणार
पालघर जिल्ह्यात अजून वरचेवर भूकंपाचे धक्के बसने सुरूच असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. कालच्या दिवसभरात भूकंपाचे ५ सौम्य धक्के जाणवले तसेच यामध्ये अनेक घरांना तडे गेल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई-ठाण्यात मराठी माणूस कोणासोबत? 'उत्तर भारतीय सन्मान' की 'मराठी आत्मसन्मान'? सविस्तर
आगामी निवडणुकीत पुन्हा मराठी विरुद्ध अमराठी असा संघर्ष उफाळून येऊ शकतो. त्यात मुंबई आणि ठाण्यातील मागील काही वर्षात अनेक लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघात अमराठी मतदारांचे प्रमाण इतके वाढले की शिवसेनेसारख्या पक्ष सुद्धा मतांच्या लाचारीत मुंबई, ठाणे आणि मीरा भाईंदर’सारख्या शहरांमध्ये ‘उत्तर भारतीय सन्मान’ मेळावे आयोजित करून मराठी अस्मिता खुलेआम वेशीवर टांगताना दिसत आहेत. किंबहुना मुंबई ठाण्यासारख्या शहरातील मराठी माणूस हा शिवसेनेसाठी केवळ मतांसाठीच राखीव असल्याचे सध्याचे चित्र आहे.
6 वर्षांपूर्वी -
विरोधकांमध्ये फंडिंग चर्चा? बवंआ'च्या सभांना भाजप'प्रमाणे महागडे मंच, एलईडी, मैदानं व संसाधनं?
भाजपच्या प्रत्येक सभा आणि सभेदरम्यान सहज नजरेस पडणारी महागड्या सभेची संसाधनं म्हणजे भव्य मंच, त्यामागील भव्य एलईडी डिस्प्ले, भव्य मैदान आणि अगदी आदेशाप्रमाणे करण्यात येणारे सभेचे थेट प्रक्षेपण हे डोळे दिपवून टाकणारं आहे. परंतु, त्यासाठी खर्ची करावा लागणारा प्रचंड पैसा विरोधकांच्या मनात वेगळीच शंका व्यक्त करत आहे. कारण, कोणत्याही केंद्रीय, राज्य, महानगरपालिका, नगरपालिकामध्ये सत्तेत नसलेल्या दोन पक्षांकडे नेमका पैसा कुठून येतो आहे, असा प्रश्न विरोधकांना पडला आहे.
6 वर्षांपूर्वी -
‘ठाकरे’ सिनेमा नक्की बघा! तो बनवतांना आम्ही अभिजीतची मेहनत पाहिली आहे: राजू पाटील
एकीकडे ठाकरे सिनेमाच्या प्रोमोवरून वाद निर्माण झाला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मात्र ‘ठाकरे’ सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यासाठी सर्वांनी अभिजित पानसेंच्या मेहनतीचे कौतुक करत सिनेमा आवर्जून पाहण्याचे आवाहन केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
गड्याने सर्व थिएटर बुक करून, अभिजित पानसे दिग्दर्शित 'ठाकरे' सिनेमाचा बॅनर लावला
‘ठाकरे’ सिनेमाच्या स्क्रिनिंगच्या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे आणि निर्माता संजय राऊत यांच्यामध्ये काही तरी वाद झाल्याचे वृत्त सुरुवातीला पसरले होते. प्रथम सदर विषयाला अनुसरून प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दोन्ही बाजूने काहीतरी सारवासारव करण्यात येत होती. परंतु, सध्या सुरु असलेल्या ट्विटर वॉर’वरून तरी ते वाद सत्य असल्याचं समोर येऊ लागलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के
पालघर : पालघर जिल्ह्यातील तलासरी-डहाणू तालुक्यात आज सकाळी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज सकाळी ९ वाजून १३ मिनिटांनी पहिला तर ९ वाजून १५ मिनिटांनी दुसरा भूकंपाचा धक्का लागला असे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये ISIS चे ९ हस्तक ATSच्या ताब्यात
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य ATS ने मुंबईलगतच्या मुंब्रा तसेच औरंगाबादमध्ये धडक कारवाई करत ISISच्या तब्बल ९ हस्तकांना ताब्यात घेतलं आहे. महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडून संशयास्पद साहित्य सुद्धा आढळले आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेत माझ्यावर अन्याय, मनसेने आवाहन केलं होतं, पण निर्णय योग्य वेळी : केदार दिघे
सध्या रत्नागिरीचे माजी खासदार निलेश राणे यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर केदार दिघेंकडे प्रसार माध्यमांचे कॅमेरे फिरले आहेत. केदार दिघे यांचं वय सध्या ३८ वर्ष असून आनंद दिघेंचे पुतणे या नात्याने त्यांनी वयाच्या १९व्या वर्षी आनंद दिघेंना अग्नी दिला होता. सध्या ते ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेमार्फत ठाणेकरांशी जोडले गेले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मराठी सिनेमे ‘नशिबवान’ नाहीत; भाऊ कदमची पोस्ट
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी चित्रपटांची गळचेपी झाल्याचं उदाहरण समोर आलं आहे. विशेष करून हिंदी भाषिक सिनेमांमुळे मराठी चित्रपटांची होणारी गळचेपी रोजचीच झाली आहे .कारण ‘आणि…डॉ काशिनाथ घाणेकर’, भाई, लव्ह यू जिंदगी या चित्रपटानंतर आता भाऊ कदमची मुख्य भूमिका असलेला ‘नशिबवान’ या चित्रपटाला शो मिळणे सुद्धा फार कठीण झाले आहे. त्यामुळे भाऊने कदमने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून स्वतःच्या भावना आणि चीड व्यक्त केली आहे. ‘नशिबवान’ हा चित्रपट मागील शुक्रवारी म्हणजेच ११ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता.
6 वर्षांपूर्वी -
उत्तर भारतीयांच्या सन्मान रॅलीत सेनेचे मंत्री-आमदार-खासदार जातात, मग मराठी बेस्ट कामगारांसाठी?
मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये उत्तर भारतीय समाज संकटात सापडताच मुंबई आणि ठाण्यात थेट ‘उत्तर भारतीय सन्मान मेळावे आणि मोर्चे’ आयोजित करणारा शिवसेना पक्ष बेस्टचा मराठी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय रास्त मागण्यांसाठी संपावर गेल्यावर कुठे मग्न होता, असा प्रश्न मुंबईकरांना मागील ९ दिवसांपासून पडला आहे.
6 वर्षांपूर्वी -
#BreakingNews - भाजप डोंबिवली शहर उपाध्यक्षाच्या दुकानातून १७० प्राणघातक शस्त्रे जप्त
डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याच्या दुकानातून कल्याण गुन्हे शाखेने तब्बल १७० प्राणघातक शस्त्रे जप्त केल्याने मोठी राजकीय खळबळ माजली आहे. धनंजय कुलकर्णी या भाजप कार्यकर्त्यांचं वय वय ४९ वर्षे असून, त्याला ताब्यात घेऊन त्याची रवानगी आधारवाडी तुरुंगात करण्यात आल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
आनंद दिघेंच्या हत्येचा कट बाळासाहेबांनी रचला होता; नंतर रुग्णालयात मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले
शिवसेनेचे ठाण्यातील दिवंगत नेते आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. परंतु, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरुन आणि आदेशाप्रमाणे त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे सामान्यांना भासवण्यात आले, असा धक्कादायक आणि अति गंभीर आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते, माजी खासदार आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी केला आहे. तसेच हा प्रकार ज्या २ शिवसैनिकांना सहन न झाल्याने त्यांना देखील संपवण्याचे आदेश बाळासाहेबांनी दिल्याचा आरोप सुद्धा यावेळी निलेश राणे यांनी केला आहे. एका मुलाखती दरम्यान बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
अविनाश जाधव व MMRDA अतिरिक्त आयुक्तांची भेट, रखडलेल्या रांजणोली व मानकली उड्डाणपुलांचे काम सुरू होणार
MMRDA च्या माध्यमातून प्रस्तावित आणि मागील ५ वर्षांपासून रखडलेल्या रांजणोली-मानकोली या दोन उड्डाणपुलांचे काम या महिन्याच्या अखेरीस सुरु होणार असल्याचे आश्वासन MMRDAचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. मनसे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत MMRDAचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांची भेट घेतली आणि बैठकीत सर्व विषय तसेच अडचणीचा पाढा वाचला.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: दिव्यांग महिलेची टिंगल करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला महाराष्ट्र सैनिकाच्या मदतीने अद्दल घडवली
दिवा येथे वास्तव्यास असणाऱ्या नूतन शेलार या दिव्यांग महिला असून, त्या काही कामानिमित्त घाटकोपर मार्गे अंधेरी येथे आल्या होत्या. त्यांच्या सोबत कुटुंबातील इतर सदस्य सुद्धा उपस्थित होते. दरम्यान, अंधेरी येथे मेट्रोने उतरताच त्या वॉशरूमच्या दिशेने जात असताना तिथल्या सुरक्षा रक्षकाने त्यांच्या चालण्याची टिंगल टवाळी करण्यास सुरुवात केली.
6 वर्षांपूर्वी -
शेलार मामा, हे बघा! भागवतांना सुद्धा चौकीदारची मूलाखत समजली नाही: गजानन काळे
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीवरून एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आणि ते भाजपच्या चांगलंच जिव्हारी लागल्याचे दिसले. त्या व्यंगचित्रात स्वतः मोदी हेच मोदी यांना प्रश्न विचारत असल्याची मार्मिक टिप्पणी केली होती. त्यावर चवताळलेले भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी लगेच ट्विट करत, ‘राज ठाकेर यांना ही मुलाखत समजणं अवघड असून त्यांनी चला हवा येऊ द्या, हा कार्यक्रम बघावा’, असा खोचक टोला लगावला होता.
6 वर्षांपूर्वी -
बुडत्या जहाजाची जाणीव? खासदार कपिल पाटील भाजपला रामराम करत काँग्रेसवासी होणार?
ठाणे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार वरिष्ठ काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. ठाणे भिवंडी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे खासदार कपिल पाटील हे सध्या ठाणे जिल्ह्यात भाजपचे एकमेव खासदार आहेत. त्यात स्वतः कपिल पाटील यांनीच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेस प्रवेशबाबत तब्बल ३ वेळा भेट घेऊन चर्चा केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
राजमार्ग: गांडूळवाड एक दुर्गम आदिवासी गाव आणि अमित ठाकरेंचा दौरा : सविस्तर
राज्यातील अनुभवी आणि वरिष्ठ नेत्यांचा म्हणजे शरद पवार असो किंवा बाळासाहेब ठाकरे यांनी मैलोंमैल पायपीट करून आधी महाराष्ट्राचा प्रत्येक कोपरा समजून घेतला होता. राज्यात राजकारणात जर भविष्य घडवायचं असेल तर आधी ग्रामीण महाराष्ट्रातील दुर्गम भागांना भेटी देऊन तो समजून घ्यावा लागतो. राज ठाकरे यांनी सुद्धा तो मार्ग स्वीकारला होता आणि अनेक वर्षांपासून अशा दुर्गम भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन तिथल्या मूळ अडचणी समजून घेत आले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
बुलेट ट्रेनचा वसई-विरार शहराला उपयोग नाही, बविआ'चा तीव्र विरोध
वसई-विरार शहरातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनला नव्याने निर्माण झालेल्या महापालिकेने तीव्र विरोध दर्शविला आहे. सदर विषयाला अनुसरून बुलेट ट्रेनसाठी महापालिकेकडे संरेखन करण्याचा प्रस्ताव आणि विकास हस्तांतर देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असता पालिकेने तो फेटाळून लावला आहे. त्यांच्यानुसार बुलेट ट्रेनचा वसई-विरार शहराला काहीसुद्धा उपयोग नाही, त्यामुळे केवळ स्थानिक शेतकरी मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त होणार आहे अशी भूमिका सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी