महत्वाच्या बातम्या
-
ठाणे जिल्ह्यात कोरोनाची वाढती साथ चिंताजनक, मुख्यमंत्र्यांची व्हीसीद्वारे बैठक
ठाणे जिल्ह्यात कोरोनाची वाढती साथ चिंताजनक आहे. मात्र कोरोनाची एकांगी लढाई लढू नका, आपापल्या शहरांतील नागरिकांना, स्वयंसेवी संस्थाना यात सहभागी करून घ्या, जेणे करून या साथीवर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
जसे ५ नगरसेवकांसाठी रूसलात तसेच गोरगरीबांसाठी पुन्हा एकदा रूसा - गजानन काळे
पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांची घरवापसी झाली आहे. 4 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पाचही नगरसेवक शिवसेनेत परतले आहेत. पाचही नगरसेवकांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. याआधी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह या पाचही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत 20 मिनिटं चर्चा केली होती.
5 वर्षांपूर्वी -
भोंगळ कारभार, कोरोना रुग्ण जिवंत असताना मृत्यू झाल्याचा कुटुंबियांना कॉल
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत आता चीनलाही मागे टाकले असल्याचे धक्कादायक वास्तव आकडेवारीने समोर आले आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८५ हजार ३२० आहे, तर मुंबईत ही संख्या ८५ हजार ७२४ झाली आहे. चीनमध्ये ४ हजार ६४८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मुंबईतील कोरोनाबळींची संख्या ४ हजार ९३८ आहे.
5 वर्षांपूर्वी -
धक्कादायक! एक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्येत ठाणे जिल्ह्याने मुंबईला मागे टाकलं
महाराष्ट्रात ६ हजार २३४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासात १९८ मृत्यू करोनामुळे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या या संख्येमुळे महाराष्ट्रातील करोना एकूण करोना रुग्णांची संख्या १ लाख ९२ हजार ९९० इतकी झाली आहे. ज्यापैकी १ लाख ४ हजार ६८७ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात ८ हजार ३७६ रुग्णांचा मृत्यू करोनाची बाधा झाल्यामुळे झाला आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ७९ हजार ९११ अॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा वेग अजून वाढला, आज ५६४ नवे रुग्ण
महाराष्ट्रात ६ हजार २३४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासात १९८ मृत्यू करोनामुळे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या या संख्येमुळे महाराष्ट्रातील करोना एकूण करोना रुग्णांची संख्या १ लाख ९२ हजार ९९० इतकी झाली आहे. ज्यापैकी १ लाख ४ हजार ६८७ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात ८ हजार ३७६ रुग्णांचा मृत्यू करोनाची बाधा झाल्यामुळे झाला आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ७९ हजार ९११ अॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कल्याण डोंबिवलीत आज ५६० नवे रुग्ण, रुग्णांची रुग्णवाहिकेतून गुरांप्रमाणे वाहतूक
कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरुच आहे. आजची रुग्णसंख्या ५६० झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने ही माहिती दिली आहे. सध्याच्या घडीला कल्याण डोंबिवलीत उपचार घेत असलेल्यांची संख्या ४ हजार २६८ आहे. आत्तापर्यंत ३०९० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आत्तापर्यंत १२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नवी मुंबईत कोरोनाचं प्रचंड थैमान, पुन्हा लॉकडाउनची घोषणा
नवी मुंबईत कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. त्यामुळे नवी मुंबईत २९ जूनपासून पुन्हा लॉकडाउन घोषित करण्याचा निर्णय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे २९ जूनपासून ७ दिवसांसाठी हा लॉकडाउन असणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शहरातील ४४ कंटेन्मेंट झोनमध्ये पुन्हा लॉकडाउन असणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
आधी पालकमंत्रीच आरोग्यमंत्री होते, खासदार डॉक्टरच आहेत, तरी KDMC'ची आरोग्यसेवा थर्डक्लासच
ठाणे जिल्ह्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या व तुटपुंजी उपाययोजना लक्षात घेऊन ठाणे महापालिका आयुक्तांसह चार आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र खरी गरज आहे ती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आता बदला अशी मागणी भाजप आणि मनसेने केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मुकुंद केणी यांचं कोरोनामुळे निधन
ठाण्यात कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांचे निधन झाले आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
5 वर्षांपूर्वी -
नवी मुंबईत करोनाबाधित महिलेचा मृत्यू; कारण अजून निश्चित नाही
वाशी येथे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचा आज मृत्यू झाला. मात्र, या महिलेच्या मृत्यूचं कारण गुलदस्त्यात आहे. या महिलेचा मृत्यू करोनाने झाला की अन्य कारणाने याचा तपास केला जात असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगितलं जात आहे. या महिलेचा करोनाने मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाल्यास राज्यातील करोनाचा हा चौथा बळी असेल असेही सूत्रांनी सांगितलं. सदर महिला वाशीतील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. तिला करोनाची लागण झाल्याचंही निष्पन्न झालं होतं. मात्र, तिचा करोनानेच मृत्यू झाल्याचं अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आरोग्य विभाग याबाबत तपास करत आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना लॉकडाउन असताना फिरणाऱ्या दुचाकी स्वाराने पोलिसावर गाडी घातली
कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. दररोज नवीन रुग्णांची यात भर पडत आहे. देशभरात लॉकडाउन जाहीर झालं आहे. पोलीस आपला जीव धोक्यात घालून लोकांना घरात राहण्यास सांगत आहे. पण, वसईमध्ये एका तरुणाने पोलिसांवरच गाडी घालून जखमी केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
5 वर्षांपूर्वी -
३ वर्षांच्या मुलीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह; मुलांची योग्य काळजी घ्या
कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पुढचे १५ दिवस महत्त्वाचे आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. खबरदारीच्या पार्श्वभूमीवर घरातून बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी केले आहे. कोरोना हे जागतिक संकट असून त्यावर आपण मात निश्चित करु. पण त्यासाठी आपल्याला राज्य सरकारने दिलेल्या सूचनांच पालन करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेकडून सरकारच्या नियमावलीचे उल्लंघन; मिसळ महोत्सवाचे आयोजन; मनसेकडून प्रश्न
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर आणि पिंपरी-चिंचवड येथील शाळा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. जनतेच्या हितासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. याबाबत घेतलेले निर्णय काल मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याचेही त्यांनी म्हटले. दहावी आणि बारावीची परीक्षा वगळता शालेय परीक्षा उशिरा घेण्याबाबतही विचार सुरु असल्याचे ते म्हणाले होते.
5 वर्षांपूर्वी -
नवी मुंबईत शिवसेनेला खिंडार; भाजपने सेनेचे नगरसेवक फोडले
नवी मुंबईत शिवसेनेला खिंडार पडलं आहे. 3 नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहेत. घनसोलीतील तीन नगरसेवकांनी आयुक्तांकडे राजीनामा सोपवला आहे. नगरसेवक प्रशांत पाटील, नगरसेविका कमलताई पाटील आणि नगरसेविका सुवर्णा पाटील यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेनेतचे तिन्ही नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
... मग पवार साहेबांचाही बाप काढणार का? गणेश नाईक संतापले
राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये गेलेले गणेश नाईक यांच्यात सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. जितेंद्र आव्हाडांनी गणेश नाईकांचा खंडणीखोर म्हणून उल्लेख केल्यानंतर आता टीकेची पातळी बापापर्यंत येऊन पोहोचली आहे. पक्ष बदण्याच्या भूमीकेवरुन गणेश नाईकांवर टीका करताना, मला दर १० वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही, असं जितेंद्र आव्हाडांनी काल म्हटलं होतं. त्यावर बोलताना, पवार साहेबांनीही (शरद पवार) अनेक वेळा पक्ष बदलले, मग आता त्यांचाही बाप काढणार का? असा सवाल गणेश नाईकांनी विचारला आहे.
5 वर्षांपूर्वी -
माहिती तंत्रज्ञान आणि पर्यावरण खात्यावर अमित ठाकरेंची नजर राहणार
राज्य सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेने महाअधिवेशनात शॅडो कॅबिनेट स्थापणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार मनसेने शॅडो कॅबिनेटची स्थापना केली असून त्यात राज ठाकरेंनी विशिष्ट स्थरातील पदाधिकाऱ्यांना स्थान दिलं आहे. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान शॅडो कॅबिनेटमधील प्रत्येक नेत्यावर संबंधित खात्याच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. तसेच शॅडो कॅबिनेटमधील हे नेते एखाद्या मंत्र्याने गैरव्यवहार केला, तर त्याचा पाठपुरावा करणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सरकारच्या कारभारावर नजर; मनसेच्या शॅडो कॅबिनेटमधील सदस्य जाहीर
राज्य सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेने महाअधिवेशनात शॅडो कॅबिनेट स्थापणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार मनसेने शॅडो कॅबिनेटची स्थापना केली असून त्यात राज ठाकरेंनी विशिष्ट स्थरातील पदाधिकाऱ्यांना स्थान दिलं आहे. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान शॅडो कॅबिनेटमधील प्रत्येक नेत्यावर संबंधित खात्याच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. तसेच शॅडो कॅबिनेटमधील हे नेते एखाद्या मंत्र्याने गैरव्यवहार केला, तर त्याचा पाठपुरावा करणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
तुम्ही जिम'मध्ये या औषधाचं सेवन करता? मग जिम ट्रेनर मेघनाचा मृत्यूचं मुख्य कारण वाचा
ठाण्यात राहणाऱ्या २२ वर्षीय महिलेने बंदी असलेले वजन कमी करण्याच्या गोळ्या घेतल्यानंतर काही तासातच तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. मेघना देवगडकर असे या महिला नृत्यांगनेचं नाव आहे. ती जिम ट्रेनर म्हणूनही काम करत होती. तिने बंदी असलेले औषध डिनिट्रोफेनॉल घेतले त्यानंतर १५ तासांच्या आत तिच्या मृत्यू झाल्याचे समोर आले होतं. सोमवारी मेघना देवगडकर एका जीममध्ये वर्कआऊट करण्यापूर्वी गोळी घेतली होती. या ठिकाणी काही काळापूर्वी तीने ट्रेनर म्हणून नोकरी जॉईन केली होती.
5 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवण्याचं माझं कॉलेजमध्ये असल्यापासूनचं स्वप्न: राज ठाकरे
एका मराठी दैनिकाच्या वतीने ठाण्यामध्ये ‘कलासंगम २०२०’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रकट मुलाखतीने या कार्यक्रमाची सांगता होत आहे. जेष्ठ पत्रकार अंबरीष मिश्र ही मुलाखत घेत आहेत. या मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांनी राजकारणावर चौफेर फटकेबाजी केली.
5 वर्षांपूर्वी -
'त्या' काळी फडणवीस हे साडेतीन शहाण्यांपैकी एक होते : राज ठाकरे
एका मराठी दैनिकाच्या वतीने ठाण्यामध्ये ‘कलासंगम २०२०’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रकट मुलाखतीने या कार्यक्रमाची सांगता होत आहे. जेष्ठ पत्रकार अंबरीष मिश्र ही मुलाखत घेत आहेत. या मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांनी राजकारणावर चौफेर फटकेबाजी केली.
5 वर्षांपूर्वी