कोरोना इंजेक्शन असो की ई-पास...बिनधास्तपणे काळाबाजार

उल्हासनगर, २४ जुलै : कोरोनाचा रुग्ण हा क्रिटिकल अवस्थेत आल्यावर त्याला देण्यात येणारे टोलसीझुबम हे महागडे इंजेक्शन ब्लॅकमध्ये विकणाऱ्या उल्हासनगरातील एका सेवानिवृत्त शिक्षिकेला फूड अँड ड्रग्ज शाखेने सापळा रचून गजाआड केले आहे. यामागे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता सहआयुक्त (दक्षता) सुनील भारद्वाज यांनी वर्तवली आहे.
काल रात्री उल्हासनगरात उच्चभ्रू वसाहत मनिष नगरमध्ये राहणारी नीता पंजवानी ही महिला कोरोनवरील सिपला कंपनीचे टोलसीझुमब ऍक्टरमा-४०० हे ४० हजार ५४५ रुपयांना मिळणारे इंजेक्शन ६० हजार रुपयांना विकत असल्याची माहिती फूड अँड ड्रग्ज खात्याला मिळाली होती. त्यानुसार अन्न आणि प्रशासन आयुक्त अरुण उन्हाळे, सहआयुक्त दक्षता सुनील भारद्वाज, पवनीकर, प्रवीण पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न आणि औषध निरीक्षक निशिगंधा पाष्टे, नितीन अहेर, संदीप नरवणे, कल्याण गुन्हे अन्वेषणचे संज्यू जॉन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. एच .मुदगुल यांनी नीता पंजवानी यांच्याकडे बनावट ग्राहक पाठवले. टोलसीझुमब हे इंजेक्शन ६० हजार रुपयात देताना नीता हिला अटक करण्यात आले.
दुसरकडे, कोरोनाच्या नावाखाली ई-पासचा घोटाळा करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून हे दोघे बिनधास्तपणे ई-पासचा काळाबाजार करत होते. झेरॉक्सच्या दुकानात कसलीही भीती न बाळगता त्यांचा हा गोरखधंदा राजरोसपणे सुरु होता. नालासोपाला येथे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ऐरवी ई-पास काढण्यासाठी 15 दिवस ते महिना लागतो. पाससाठी शासनाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र, हे महाशय केवळ 15 मिनिटांत ई पास मिळवून देत होते. आणि त्यासाठी आरोपी 1500 रुपये घेत होते. 1500 रुपयांत कुणालाही 15 मिनिटांत ते पास मिळवून देत होते.
पोलिसांनी आता या ब्रिजेश दुबे आणि आणि अतिश गडा दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तुळींज पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी सांगितलं की, हे दोघे किती दिवसांपासून ई पास काढून देत होते आणि त्यांनी कुणाकुणाला पास दिला आहे. याचा तपास पोलीस करत असून तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने व दत्तात्रय पाटील यांनी लोकांना आवाहन केलं आहे की, असे पास साठी कोणाकडून पैसे उकळले असतील तर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करावी.
News English Summary: A retired teacher in Ulhasnagar has been caught red-handed by the Food and Drug Administration (FDA) for selling expensive injectable black injections of Tolzizubam, which is given to a corona patient when he is in critical condition. Joint Commissioner (Vigilance) Sunil Bhardwaj has raised the possibility of a big racket being exposed.
News English Title: Retired teacher arrested for black marketing corona injection in Ulhasnagar News latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं