पालघर: शिवसेनेचे विद्यमान आमदार अमित घोडा यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पालघर: निवडणुकांचे अर्ज भरण्यास सुरुवात झालेली असताना देखील अजून पक्षप्रवेश सूरच आहेत. सत्ताधारी पक्षातील म्हणजे शिवसेना आणि भाजपमधील तिकीट न मिळालेली मंडळी दुसऱ्या पक्षात उडया घेताना दिसत आहेत. पालघर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अमित घोडा यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आता एनसीपी’मध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेने पालघर विधानसभेसाठी श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली आहे.
त्यामुळे संतापलेले विद्यमान आमदार अमित घोडा यांनी पुन्हा एकदा एनसीपी’मध्ये प्रवेश केला आहे. अमित घोडा हे माजी आमदार कृष्णा घोडा यांचे चिंरजीव आहेत. २०१४ साली कृष्णा घोडा यांनी राष्ट्रवादीला सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. अवघ्या पाचशे मतांनी त्यांचा विजय झाला होता. त्यानंतर एकाच वर्षात त्यांचे निधन झाल्यामुळे पोटनिवडणुकीत अमित घोडा आमदार म्हणून निवडून आले होते.
@ShivSena पक्षाचे विद्यमान आमदार अमित घोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पालघर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याचे संकेत. @NCPspeaks @nawabmalikncp @AjitPawarSpeaks #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/aR3KULVimL
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) October 3, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं