धक्कादायक! शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक

अंबरनाथ : अंबरनाथमधील शिवसेनेच्या माजी नगरसेवकावल बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच याप्रकरणात त्याला अटकही करण्यात आली आहे. प्रधान पाटील असं या माजी नगरसेवकाचे नाव आहे. अंबरनाथमध्ये एका महिलेने शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर गुरुवारी बलात्काराचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आज पोलिसांनी याची दखल घेत प्रधान पाटील याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी प्रधान पाटील याला अटक केली आहे. याप्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत. लवकरच या प्रकरणातील संपूर्ण माहिती समोर येईल.
दरम्यान एप्रिल २०१८ मध्ये एडीआर’ने प्रसिद्ध केलेल्या या अहवालात भारतातील ५१ खासदार आणि आमदारांवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले होते. त्यात भारतीय जनता पक्ष आघाडीवर होता आणि त्यांच्या १४ लोकप्रतिनिधी, शिवसनेच्या ७ आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या ६ लोकप्रतिनिधीं विरोधात महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्या अहवालानंतर सत्ताधारी आणि विरोधक दोघेही अडचणीत सापडले होते.
‘एडीआर’ म्हणजे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालात महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये विनयभंग, अपहरण, बलात्कार, वेश्या व्यवसायासाठी महिलांची तस्करी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे असं स्पष्ट केलं आहे. एडीआरने संपूर्ण राज्यनिहाय आकडेवारी जाहीर केली होती. त्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील एकूण ५१ खासदार आणि आमदारांपैकी महाराष्ट्रातील १२ खासदार आणि आमदारांवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. तर द्वितीय स्थानी पश्चिम बंगाल आहे. त्यात आता शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने अजून एक भर टाकली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं