अयोध्येला नक्की जा म्हणजे तुमचे खरे रक्त जागे होईल: देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई: नवी मुंबईच्या नेरुळमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन होतंय. या अधिवेशनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा संघटनात्मक बांधणीला सुरुवात करणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदी सूत्रं हाती घेतली. त्यानंतर झालेल्या भाषणात त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, हे सरकार पडावं अशी आम्ही वाट बघत नाही. मात्र आपसातील भांडणांमुळेच हे सरकार कोसळेल असंही त्यांनी सांगितलं. यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी महाराष्ट्रात ऐकला चलो रे चे संकेत दिले आहेत.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. यावेळी बोलताना जेपी नड्डा यांनी म्हटलं की, ‘कल भी हमारा था, आज भी हमारा है, कल भी हमारा होगा’. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, समाजवादी पक्ष, डीएमके या पक्षांना वंशवादाची लागण झाली आहे. फक्त भारतीय जनता पक्ष असा पक्ष जो एका चहावाल्याला पंतप्रधान आणि मिल कामगाराच्या मुलाला राज्याचा प्रदेशाध्यक्ष बनवू शकतो.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शहरी नक्षलवादाचे सत्य बाहेर येईल म्हणून एसआयटी मागणी करण्यात येत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केला. याशिवाय, सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेना कशी बसते? अशा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. शिवाय, अयोध्येला नक्की जा म्हणजे तुमचे खरे रक्त जागे होईल, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
Web Title: Story Go Ayodhya so your real blood will wake Opposition leader Devendra Fadnavis attacks CM Uddhav Thackeray.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं