भिवंडी: राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात दोन पदाधिकारी आव्हाड यांच्या समोरच भिडले

भिवंडी : एनसीपी’चे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा नागरी सत्कार कार्यक्रम भिवंडी तालुक्यातील महापोली येथे आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात एनसीपी’चा पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांच्या या नाट्यमय वादावर जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त करत मला अंधारात ठेऊन काही करू नका, असा कार्यकर्त्यांना सल्ला दिला. या कार्यक्रमात एनसीपी’चे प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ व एनसीपी’चे ठाणे जिल्हा अध्यक्ष दशरथ तिवरे यांच्यात कार्यक्रमाच्या स्टेजवरच बाचाबाची सुरु झाली होती.
एनसीपी’च्या कार्यकर्त्यांच्या या नाराजीनाट्यावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका करीत. दुसऱ्याच्या कार्यक्रमात येऊन घाण करता कशाला, अशा तीव्र शब्दात एनसीपी’चे प्रदेश सरचिटणीस असलेल्या पिसाळांवर टीका केली. तर जिल्ह्याचे नेते कार्यकर्त्यांना देत नाहीत, तुमच्याकडे जे ऐश्वर्य आले आहे ते कार्यकर्त्यांचे आहे ” अशा तीव्र शब्दात त्यांनी जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे यांच्यावर देखील टीका करत पदांसाठी भांडू नका, असा सल्ला या कार्यक्रमाप्रसंगी कार्यकर्त्यांना दिला.
आज भिवंडी येथील महापेली ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहून कार्यकर्त्यांनी केलेल्या सत्काराचा स्वीकार केला. प्रसंगी उपस्थितांना संबोधित केले. सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक धन्यवाद..#24तास_जनतेसाठी pic.twitter.com/F76VFvAopm
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 23, 2020
मागील ५ वर्षात राष्ट्रवादी पक्ष जर कुणी बुडवला असेल तर त्याचे नाव गणेश नाईक आहे, अशी टीका त्यांनी नाईकांवर याप्रसंगी केली. एनसीपी सोडून गेलेले भारतीय जनता पक्षाचे सध्याचे भिवंडी लोकसभा खासदार कपील पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा यांच्यावर देखील त्यांनी याप्रसंगी टीका केली.
News English Summery: Nationalist Congress Party leader and state Home Minister Jitendra Awhad had organized a civil hospitality program at Mahapoli in Bhiwandi taluka on Sunday. In this program, the internal controversy of the NCP came to light. Jitendra Awhad expressed his anger at this dramatic promise of the workers and advised the workers not to do anything in the dark.
Web Title: Story internal dispute in NCP leader and minister Jitendra Awhad is outraged at Bhivandi.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं