कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा वेग अजून वाढला, आज ५६४ नवे रुग्ण

कल्याण-डोंबिवली, ३ जुलै : महाराष्ट्रात ६ हजार २३४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासात १९८ मृत्यू करोनामुळे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या या संख्येमुळे महाराष्ट्रातील करोना एकूण करोना रुग्णांची संख्या १ लाख ९२ हजार ९९० इतकी झाली आहे. ज्यापैकी १ लाख ४ हजार ६८७ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात ८ हजार ३७६ रुग्णांचा मृत्यू करोनाची बाधा झाल्यामुळे झाला आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ७९ हजार ९११ अॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
मात्र धक्कादायक गोष्ट म्हणजे कल्याण डोंबिवलीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतानाच आज बाधितांच्या एकूण आकड्याने ८ हजारांचा टप्पा पार केला आहे. आज आतापर्यंतचे सर्वाधिक ५६४ नवे रुग्ण सापडले आहेत. काल हाच आकडा ५६० होता. तर, आज दिवसभरात ३ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
आजच्या या ५६४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ८०४९ झाली असून यामध्ये ४७०४ रुग्ण उपचार घेत असून ३२१५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ५६४ रूग्णांपैकी कल्याण पूर्व -११४, कल्याण प.-१५७, डोंबिवली पूर्व -१७४, डोंबिवली प.-८७, मांडा टिटवाळा- १७, मोहना -१५ रुग्णांचा समावेश आहे.
News English Summary: While the number of corona victims in Kalyan Dombivali is increasing day by day, today the total number of corona victims has crossed the level of 8000. Today, the highest number of 564 new patients has been found so far.
News English Title: The number of corona victims in Kalyan Dombivali is increasing day by day News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं