माजी आ. प्रकाश भोईर यांच्या पाठपुराव्याने टिटवाळा पर्यटन केंद्र झालं खरं; मात्र भाजप-सेनेचं दुर्लक्ष

कल्याण: काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने गडकिल्ले भाडेतत्वावर देण्याचा धक्कादायक निर्णय घेतला होता आणि त्यानंतर सरकारवर सर्वच थरातून टीका करण्यात आली होती. वास्तविक राज्य सरकार हे पर्यटन धोरणाच्या बाबतीत अत्यंत असंवेदलशील असल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यातील अजून एक उदाहरण समोर आलं आहे. नव्याची निर्मिती नाही मात्र असलेलं टिकवणं किंवा वाढवणं देखील भाजप शिवसेनेच्या सरकारला शक्य नसल्याचं सिद्ध होतं आहे.
टिटवाळा तीर्थस्थळाच्या विकासाठी तत्कालीन राज्य शासनाच्या पर्यटन मंडळाने पुढाकार घेतला होता. त्यानुसार या परिसरातील तब्बल १४.४७ एकर जागेचा विकास शासनाच्या निधीतून करण्यात येणार होता. टिटवाळा परिसरातील साडेचौदा एकर जागेचा विकास करून तेथे पर्यटन निवासाची व्यवस्था करण्यात येणार होती. टिटवाळा हे पर्यटन क्षेत्र असून ठाणे जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने टिटवाळा मंदिरात येतात.
याच हजारो भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी हा क्षेत्राचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा यासाठी पाठपुरावा केला होता. प्रकाश भोईर यांच्या मागणीची दखल घेत तत्कालीन राज्य शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाने या क्षेत्राच्या विकासाला मंजुरी देतानाच या जागेत संरक्षण भिंत उभारण्याचे काम सुरु केले होते.
मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची १४ एकर जागा पडीक होती. त्या जागेत पर्यटन केंद्र विकसित व्हावे म्हणून तत्कालीन पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्या कडे मंजुरी मागून घेतली. त्या नुसार संबंधित विभागाने विकास आराखडा तयार केल्याचे जाहीर केले. त्यानंतर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक डॉ. जगदीश पाटील यांनी काढलेल्या परिपत्रकात पर्यटन महामंडळाकडून जागेचा विकास आराखडा मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले होते आणि या विकास आराखड्याअंतर्गत या जागेत बोटनिकल गार्डन, जलतरण तलाव, थीम पार्क, बागबगीचा, प्रदर्शन विभागासह भव्य लॉन उभारण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले होते.
मात्र विद्यमान भाजप शिवसेनेच्या राज्य सरकारला या विषयात कोणताही गांभीर्य नसल्याचं दिसत आहे. मात्र माजी आमदार प्रकाश भोईर यांनी एका चांगल्या पर्यटन केंद्रचा पाया रचला होता. भविष्यात एक चांगले पर्यटन केंद्र विकसित झालेले दिसेल, मात्र विद्यमान सरकारची अनास्था पर्यटनाला घातक दिसत आहे. २२ मार्च २०१३ ला प्रकाश भोईर यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कडून टिटवाळा पर्यटन विकास केंद्रास मंजुरी आणि जवळपास २ कोटींचा निधी आणून संरक्षण भिंत बांधून कामाला सुरुवात केली होती.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं