Sanjay Raut | राऊतांच्या जामीनाविरोधात ईडी सुपरसॉनिक वेगात हायकोर्टात, निकालाकडे लक्ष

Sanjay Raut | शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना तब्बल 100 दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे. ED ने कोर्टाविरोधात केलेलं अपीलही फेटाळण्यात आल्यामुळे संजय राऊत यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला. त्यांच्या सुटकेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.
संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो. मात्र आम्हाला जामिनाविरोधात हायकोर्टात अपील करायचं आहे. त्यामुळे न्यायालयाने राऊत यांच्या जमीन मंजुरीच्या निर्णयाला एका आठवड्याची स्थगिती द्यावी अशी मागणी ईडीने केली होती. ईडीच्या या मागणीवर न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने ईडीची मागणी फेटाळून लावत संजय राऊत यांना मोठा दिसाला दिला आहे.
ईडी वेगात उच्च न्यायालयात
संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आता ईडी मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या कामकाजाची वेळ साडे चार वाजेपर्यंत आहे. पण ईडीची ही याचिका तातडीने उच्च न्यायालयात घेतली जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जोपर्यंत मुंबई हायकोर्टाचा निकाल समोर येत नाही तोपर्यंत राऊतांनी पूर्ण लढाई जिंकलीय असं म्हणता येणार नाही. संजय राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय. पण ईडीने राऊतांच्या जामीनाविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतलीय.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: ED moved to Bombay High court against bail order of Sanjay Raut check details here 09 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं