पुणे मनसेत खळबळ, वसंत मोरेंचे निकटवर्तीय निलेश माझिरेंच्या हकालपट्टीनंतर 400 कार्यकर्त्यांचा राजीनामा

Pune MNS Vasant More | मनसेसाठी महत्वाच्या असलेल्या पुणे शहरात जमिनीवरील आणि लोकांशी जोडल्या गेलेल्या पदाधिकाऱ्यांच राजकीय खच्चीकरण राज ठाकरेंच्या जवळील नेतेच करत असल्याचं खात्रीलायक वृत्त होतं. त्यापैकी पुण्यातील एक नेता हा राज ठाकरेंशी अत्यंत जवळीक असलेला असून त्या नेत्याचा सामान्य लोकांशी कोणताही संबंध नाही अशी माहिती आहे. पुण्यात पक्ष विस्तार किंवा पक्ष संघटनेच्या बळकटीशी काडीचाही संबंध नसलेले वरिष्ठ स्थानिक पदाधिकारी वसंत मोरे आणि त्यांच्या जवळील कार्यकर्त्यांचे प्रचंड खच्चीकरण करत असल्याची माहिती समोर आली होती. आता त्याला दुजोरा मिळत आहे आणि विशेष पुण्यातील त्याच कुचकामी नेत्यांना पक्षाध्यक्ष महत्व देतं आहेत अशा तक्रारी समोर आल्या होत्या. आता त्याप्रमाणे गोष्टी घडू लागल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही.
एकीकडे कोकणच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकारणी बरखास्त करण्याची वेळ आली आहे आणि दुसरीकडे, सामान्य लोकांशी जोडले गेलेल्या वसंत मोरे यांच्या जवळील लोकांच्या हकालपट्टी करून पक्ष स्वतःच स्वतःला संपवतोय अशी राजकीय चर्चा पुण्यात सुरु झाली आहे.
400 कार्यकर्त्यांचा राजीनामा
मनसे नेते वसंत मोरे यांचे निकटवर्तीय निलेश माझिरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. 28 नोव्हेंबर रोजी निलेश माझिरे यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. निलेश माझिरे हे मनसेच्या पुणे जिल्हा माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष होते. या हकालपट्टीमुळेच निलेश माझिरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माझिरे यांच्या 400 कार्यकर्त्यांनी देखील मनसेचा राजीनामा दिला आहे.
माझिरे यांच्यासह 400 कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याने ऐन महापालिकेच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसला आहे. माझिरे यांची हकालपट्टी आणि राजीनामा यामुळे पुणे मनसेत काहीच अलबेल नसल्याचं स्पष्ट होत आहे. गेल्याच आठवड्यात मनसे नेते वसंत मोरे यांनीही पक्षाबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. पक्षातील पदाधिकारी आपल्याला विश्वासात घेत नाहीत. बैठकांना बोलावत नाहीत. मेळाव्याला, सभांना गेलं तरी भाषण करण्याची संधी देत नाहीत, असा आरोप वसंत मोरे यांनी केला होता.
मे महिन्यातील राज ठाकरेंची ती सभा :
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मे महिन्यात पुण्यात एक सभा पार पडली होती. मात्र, मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी घेतली सभेपूर्वी मोरे बागेत बैठक घेतल्याने या बैठकीचीच पुण्यात जोरदार चर्चा रंगली होती. कारण वसंत मोरे यांच्या त्या बैठकीला मनसेचे पदाधिकारी [प्रचंड संख्येने उपस्थित होते. त्यावेळी वसंत मोरे यांनी शक्ती प्रदर्शन केल्याचे दिसून आले होते. त्यामुळे वसंत मोरे यांचा सारखा पदाधिकारी मनसेला सोडून गेल्यास पुण्यात मनसे निकामी झाल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण राज ठाकरेंच्या करिष्म्याचे दिवस संपले आहेत आणि त्यांची राजकीय विश्वासहर्ता सध्या पणाला लागल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. कारण शिवसेनेच्या फुटीनंतर त्यांनी केलेली वक्तव्य आणि एकूण राजकीय हालचाली सामान्य लोकांना आवडलेल्या नाहीत. त्यामुळे आगामी निवडणुकीत मनसेला ऐतिहासिक राजकीय नुकसान होईल असं म्हटलं जातंय.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Pune MNS Nilesh Mazire exit from party check details on 05 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं