शिंदे है तो मुमकिन है? महाराष्ट्रातील गुजरात सीमेवरील जिल्ह्यांमध्ये गुजरात निवडणुकीसाठी सुट्टी जाहीर, आदेश काढले

Gujarat Assembly Election 2022 | गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. भाजप, काँग्रेससह सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. भारत जोडो यात्रेवर असलेल्या राहुल गांधींचीही गुजरातच्या प्रचारात सोमवारी एंट्री झाली. प्रशासनचीही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच महाराष्ट्रात शिंदे सरकारचा गुजरात निवडणुकीसंदर्भातला एक निर्णय खूप चर्चेत आहे. गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सुट्टी देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय सोमवारी काढण्यात आला.
काय आहे या आदेशात
या निर्णयानुसार, महाराष्ट्रात राहणाऱ्या मतदारांना गुजरात निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावता यावा म्हणून ही सुट्टी देण्यात आली आहे. चार जिल्ह्यांतल्या मतदारांना भर पगारी ही सुट्टी देण्यात येणार आहे. यामध्ये पालघर, नाशिक, धुळे आणि नंदूरबार या गुजरात सीमेवरील जिल्ह्यांचा समावेश आहे.
आदेश पाळला नाही तर कंपन्यांवर होणार कारवाई
अनेक मतदार हे महाराष्ट्र-गुजरात सीमाभागातील खाजगी कंपन्यांमध्ये काम करतात. त्यामुळं या कंपन्यांनाही सुट्टी जाहीर करणं सरकारनं बंधनकारक केलं आहे. याशिवाय ज्या कंपन्या सरकारचा आदेश पाळणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शिंदे-फडणवीस सरकारकडून देण्यात आला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Shinde government declared 1 day holiday in Maharashtra for Gujarat Assembly Election 2022 Check details on 22 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं