राज्यातील प्रकल्प गुजरातला गेल्याचा वाईट वाटत नाही, इतर राज्यांचाही विकास महत्वाचा, मग पक्षाचं नाव संघराज्य नवनिर्माण सेना करा ना

Sushma Andhare | राज ठाकरे यांनी काल गट अध्यक्षांचा मेळावा घेतला. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री पदावर असताना तब्यतीचं कारण सांगून आणि आता एकनाथ शिंदे यांनी रात्री कांडी फिरविली. आता फिरतात सगळे. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा नि फिरायचं हे मी करत नाही. उद्धव ठाकरे यांच्या अंगावर एकतरी केस आहे का. भूमिका घ्यायची नाही. फक्त पैशासाठी, स्वार्थासाठी कधी हा कधी तो, अशी टीका राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
टोलचं आंदोलन घेतलं होतं. अटक झाली. टीकेची झोड उठली. पण, ६५ टोलनाके बंद झाले. फक्त निवडणुकीत सांगितलं, आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू. पण, त्याचं काही झालं नाही. आंदोलन करत नाहीत. भूमिका घेत नाहीत. त्यांना कोणी विचारत नाही, असंही ते म्हणाले. रेल्वेचं आंदोलन झालं. मनसेचं टोलविरोधी आंदोलनं लोकं विसरले नाहीत. रेल्वेच्या परीक्षा द्यायला आलोत. महाराष्ट्रात नोकऱ्या आहेत. तिथं बाचाबाची झाले. मनसे सैनिकाला आईवरून शिवी दिली. त्यानंतर पुढचा हंगामा झाला. विशेष म्हणजे राज्यातील उद्योग गुजरातमध्ये गेल्याचं त्यांना कोणताही दुःख झालं नाही उलट इतर राज्यांचा विकास महत्वाचा अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
दरम्यान, सुषमा अंधारे यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली. एकूणच राज ठाकरे यांची आंदोलन आणि त्यांच्या भूमिकांना अर्थ नाही, असा आरोप करताना सुषमा अंधारेंनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला गेल्याबद्दल मला वाईट वाटत नाही. इतर राज्यही संघराज्य पद्धतीतील आहे, त्यांचाही विकास झाला पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. त्यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, असं असेल तर तुमच्या पक्षाचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेने ऐवजी संघराज्य नवनिर्माण सेना करा ना असं टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.
गुज्जू बिल्डरांनी जे अतिक्रमण केलं
टोलचं आंदोलन केलं. जो माणूस 25 लाखाची गाडी वापरू शकतो, तो 50रुपयांचा टोल भरूच शकतो. त्यामुळे टोलनाक्यांचं आंदोलन करण्यापेक्षा रस्ते नीट आहेत का, हे आंदोलन बघा, असा कानमंत्र सुषमा अंधारे यांनी दिला. वडापावची गाडी हटवा, टॅक्सीवाल्यांचं आंदोलन करायचं, यापेक्षा गुज्जू बिल्डरांनी जे अतिक्रमण केलं, यावर राज ठाकरे चकार शब्द बोलत नाहीत. त्यामुळे ते 360डिग्री फिरत आहेत, असंच वाटतंय.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Sushma Andhare talkes on Raj Thackeray statements check details on 28 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं