Viral Video | 10 वर्षांच्या मुलीने उचलले 102.5 किलो वजन, ताकद पाहून यूजर्स दंग, पहा व्हिडीओ

10 Years Old Girl Lifts 102 Kg Weight | ‘जिद्द’ या शब्दामध्येच खूप मोठी ताकद आहे, नाही का. आपल्या आजूबाजूला बरेच असे लोक आहेत जे स्वप्न पुर्ण करण्यासाठी दिवस रात्र एक करून कष्ट करत असतात. पण सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. 10 वर्षांची मुलगी सध्या सर्वंत्र गाजत आहे, याचे कारण म्हणजे की, अवघ्या 10 वर्षांच्या या मुलीने 102 किलो वजन उचलले आहे. सर्व जण आश्चर्यचकित होत आहेत की, या मुलीमध्ये एवढी ताकद कशी? अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणंही कठीण होतं आहे तर चला जाणून घेऊयात हे संपूर्ण प्रकरण?
10 वर्षांच्या मुलीने उचलले 102.5 किलो वजन
गुजरात स्टेट पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये 10 वर्षांच्या मुलीने असे काही करून दाखवले आहे की सर्वांनाच धक्का बसला आहे. कनक इंदर सिंग गुर्जर नावाच्या या मुलीने आपल्या 10 वर्षांच्या काळामध्ये तब्बल 102.5 किलो वजन उचलले तेव्हा तिच्या वडिलांचाही विश्वास बसेना तर त्याचे कारण, कनकचे वडील इंदर सिंग गुर्जर आणि आई धारिणी गुर्जर हे दोघेही वेट लिफ्टर आहेत. तसेच या दोघांनी देश-विदेशातील स्पर्धांमध्ये खूप नाव कमावले आहे मात्र मोठी गोष्ट म्हणजे कनकने ना सराव केला होता ना तिला वेट लिफ्टरसाठी कोणतेही प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यामुळे कनकने असा पराक्रम करून सर्वांनाच चकित केले आहे.
कनकचे अप्रतिम साहस
कनकचे वडील इंदर सिंग म्हणत होते की, मोठ्या मुलींना चॅम्पियनशिपमध्ये वजन उचलताना पाहून तिनेही ठरवले आणि प्रयत्न करण्याचा विचार केला. कनक या प्रयत्नात पुर्णपणे यशस्वी झाली यामध्ये दुमत नाही. आता याच प्रयत्नातून कनकची फ्लोरिडा, यूएसए येथे होणाऱ्या वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2022-23 साठी निवड झाल्याचे समोर येत आहे. तसेच कनकचे वडील इंदर सिंग यांनी डिसेंबर 2021 मध्ये 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते आणि आता देशभरात कनकची चर्चा होत असून लोकही आश्चर्य व्यक्त करत आहेत आणि तिच्या ताकदीचे कौतुक करत आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: 10 Years Old Girl Lifts 102 Kg Weight Video Viral Checks details 15 October 2022
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं