Viral Video | हत्ती चारचाकी कारला अक्षरशः खेळणं समजून खेळत होता, आजूबाजूच्या लोकांची बोंबाबोंब, व्हायरल व्हिडीओ पहा

Viral Video | बहुदा लोकांना हत्तीचे पिल्लू खूप आवडते. लोक इंटरनेटवर सतत प्राण्यांचे व्हिडिओ पाहत असतात. दरम्यान, अनेकदा सोशल मीडियावर हत्तीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता की, एक हत्ती चार चाकी गाडी गोल गोल फिरवत आहे. अगदी खेळण्यातली गाडी असावी आणि लहान मुलाने ती खेळत बसावी. दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकुळ घालत आहे.
हत्तीच्या कृतीने चाहते भारवले
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हत्तीचा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओमधील हत्तीचा खेळ पाहून चाहते आपल हसू थांबवू शकत नाहीत. हत्तीशी संबंधित एक व्हिडिओ समोर येत आहे जो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे दरम्यान, IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. आसाममधील गुवाहाटी येथील नरेंगे मिलिटरी स्टेशनवर रेकॉर्ड केलेल्या या व्हिडिओमध्ये एक हत्ती कारसमोर एका खेळण्याप्रणाणे खेळत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसून येते आहे.
गाडीला हत्तीने वर्तुळात फिरवले
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक हत्ती चारचाकी गाडीला वर्तुळात फिरवत आहे. तो हत्ती त्या गाडीचा अश्या प्रकारे आनंद घेत आहे जसे की, लहान मुलगा त्याच्या नवीन खेळण्याचा घेतो. शेजारील लोक त्याचे लक्ष विचलीत करण्यासाठी थाळ्या वाजवत आहेत तर काही ओरडत आहेत मात्र त्या हत्तीने गाडी फिरण्यास जिथून सुरुवात केली होती तिथे आणून तिला उभा केले. व्हिडीओला यूजरर्सच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत तसेच व्हिडिओवर कमेंट करत आहेत.
Toys-the gentle giants play with☺️☺️
From Assam. Refugees in their own land. pic.twitter.com/3MCG8DShJG— Susanta Nanda IFS (@susantananda3) September 22, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Elephant was playing with car like toy video trending on social media checks details 25 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं