Trending Video | शाळेत विद्यार्थी भांडतात इथपर्यंत ठीक आहे, पण इथे शिक्षकांमध्ये विद्यार्थांच्या समोर तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल

Hamirpur Teachers Fighting Video | अनेकदा आपण पाहतो आपल्या घरा शेजारी, किंवा घरामध्ये लहान मुलांची भावंडांची भाडणे लागतात. मात्र ती किरकोळ कारणावरून लागतात. शाळेमध्ये विद्यार्थांमध्ये कायमच कोणत्या ना कोणत्यातरी कारणावरून भांडणे होतच असतात पण यावेळी वेगळाच प्रकार समोर आला आहे. दोन शिक्षकांमध्ये कडाक्याचे भांडण लागले आहे. शाळेमधील भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात पण व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये शाळेच्या वर्गात शिक्षकांमध्ये भांडण लागल्याचे दिसून येत आहे. ही वर्गखोली मुलांनी भरलेली आहे आणि शिक्षक भांडण्यात गुंतले आहेत. शाळेत शिक्षकांच्या भांडणाचा हा व्हिडिओ पाहून यूजर्स हैराण झाले आहेत.
शिक्षकांचे कडाक्याचे भांडण लागले
शाळेतील शिक्षकांच्या भांडणाचा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यामधील आहे तर येथील एका सरकारी मुलीच्या पूर्व माध्यमिक शाळेत महिला शिक्षकांमध्ये मारहाणीची घटना समोर आली आहे. गांधी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली आहे, तर या शिक्षकांमध्ये स्वच्छतेबाबत वाद झाला, त्यानंतर त्यांच्यात हाणामारी आणि शिवीगाळ सुरू झाला. सुमारे 45 मिनिटे ही झुंज चालली होती तर अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये हस्तक्षेप करण्याचाही प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही.
भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला
अहमद खबीर यांच्या ट्विटर अकाऊंटवरून व्हायरल व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून, “उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील दोन सरकारी शाळेतील शिक्षकांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आहे” असे कॅप्शन देण्यात आले आहे. 3 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून शेकडो लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिन्ही शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका प्रीती निगम, सहाय्यक शिक्षिका नाहिद हाश्मी आणि परिचारिका पुष्पलता पांडे यांचा समावेश आहे.
A fight broke out between the two female teacher of Govt School in Hamirpur Uttar Pradesh. pic.twitter.com/iC69WoZzhv
— Ahmed Khabeer احمد خبیر (@AhmedKhabeer_) October 3, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Trending video of Hamirpur Teachers Fighting video trending on social media checks details 07 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं