Video Viral | पेशंटला स्ट्रेचरने घेऊन जाताना स्ट्रेचर अर्धवट लिफ्टमध्ये प्रवेश करताच लिफ्ट खाली गेली, असा घडला अपघात, पहा व्हिडीओ

Video Viral | आजकाल सर्व गोष्टी खुप साध्या सोप्या झाल्या आहेत. प्रत्येक गोष्टीला तंत्रज्ञानाने वेढले आहे आणि सर्व जीवनशैली तंत्रज्ञानाने सोपी केली आहे. तंत्रज्ञानामुळे आपली अनेक कामे काही मिनिटांमध्ये होऊन जातात. एकीकडे तंत्रज्ञान आपली जीवनशैली सुलभ करत आहे, मात्र दुसरीकडे तंत्रज्ञानाच्या वापराने काही धोकेही वाढत आहेत. असे म्हणण्यामागील कारण म्हणजे, सध्या इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तंत्रज्ञान कधी कधी मानवांसाठी किती धोकादायक ठरू शकते हे स्पष्ट दिसून येते आहे. हा व्हायरल व्हिडिओ हॉस्पिटलमधील असून जेव्हा एका रुग्णाला लिफ्टने घेऊन जात होते, तेव्हाच असे काही घडते की ते पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल.
अचानक लिफ्ट खाली जाऊ लागली आणि
शहरांमधील मोठमोठ्या इमारती आणि रुग्णालयांमध्ये लिफ्ट ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे मात्र कधी कधी अशा घटनाही समोर येतात जेव्हा लोकांचे प्राण वाचतात तर कधी या अपघातात लोकांना हकनाक आपला जीव गमवावा लागतो. तर सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या हॉस्पिटलच्या व्हिडिओमध्ये दोन वॉर्ड बॉय रुग्णाला स्ट्रेचरने लिफ्टमध्ये नेताना दिसत आहेत. जेव्हा रुग्णाला लिफ्टच्या आत नेले जाते तेव्हा स्ट्रेचर अर्धे आत मध्ये जाते आणि यावेळी लिफ्ट अचानक खाली जाऊ लागते. लिफ्ट खाली जाऊ लागल्याने स्ट्रेचर मध्येच अडकून वाकडी होते व रुग्ण खाली पडतो. एक वॉर्ड बॉय लिफ्टच्या आतमध्ये जातो तर दुसरा बाहेरच राहतो तसेच ही सर्व घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे जी अतिशय धोकादायक आणि भीतीदायक आहे.
व्हिडीओ झाला व्हायरल
हॉस्पिटलमधील हा व्हायरल व्हिडिओ अभिनव देशपांडे त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 282 हजार लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे. तसेच 5 हजारांहून अधिक युजर्सनी व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स रुग्णाच्या काळजीमध्ये पडले आहेत आणि अनेक युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये रुग्णाच्या प्रकृतीबद्दल विचारले आहे, तर एका यूजरने लिफ्ट कंपनीवर गुन्हा दाखल करा असे लिहिले आहे.
#Part_2 https://t.co/jtIev7l7LS pic.twitter.com/UfJOEGBAfv
— Respect_The_Law (@CITIZEN_POLIZE) October 13, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Viral video of lift malfunctions hospital patient fell down video trending checks details 17 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं