Viral Video | भाजपाची सत्ता असलेल्या यूपीत राज्य कबड्डी खेळाडूंचं जेवण शौचालयात, खेळाडूंसोबत किळसवाणा प्रकार

Viral Video | राज्य कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सहारनपूरला आलेल्या महिला खेळाडूंना व्यवस्थित जेवणही मिळालं नाही. त्यांना दुपारच्या जेवणात कमी शिजवलेला भात देण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. अनेक खेळाडूंना चापत्याही मिळाल्या नाहीत. अशा परिस्थितीत अनेक स्पर्धकांनी भाजी आणि सॅलडवर समाधान मानलं. धक्कादायक म्हणजे भात आणि पुरी तयार करून त्या शौचालयात ठेवण्यात आल्या होत्या, जिथे अति दुर्गंधीमुळे उभे राहणेही कठीण होते.
उत्तर प्रदेश क्रीडा संचालनालयाच्या अधिपत्याखाली उत्तर प्रदेश कबड्डी असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय सबज्युनिअर मुलींची स्पर्धा आयोजित करण्याची संधी सहारनपूरला मिळाली होती. येथील डॉ. भीमराव आंबेडकर क्रीडा स्टेडियममध्ये ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत १७ मंडळांचे संघ आणि एका स्पोर्ट्स होस्टेलचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी झाले. खेळाडूंच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था स्टेडियममध्येच करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे स्विमिंग पूल परिसरात जेवण तयार केले जात आहे. तसेच महिला स्पर्धकांच्या चेंजिंग रूम मध्ये आणि टॉयलेटमध्ये कच्चे रेशन ठेवले होते. इथेच विटांची चूल बनवून जेवण तयार केलं गेले आणि ते तयार करून झाल्यावर शौचालयात ठेवलं जायचं. शौचालयातील फरशीवर कागद ठेवून त्यावर भाताच्या पराती आणि पुऱ्या ठेवल्याचे आढळले. खेळाडूंना कच्चा भात देण्यात आला, जो अनेक खेळाडूंनी खाण्यास नकार दिला. या किळसवाण्या प्रकारामुळे योगी सरकारच्या कारभाराचा दर्जा समोर आला आहे. त्यामुळेच राज्यात धार्मिक मुद्दे नेहमी पेटते ठेऊन राज्यातील मूळ मुद्यांना बगल देण्याचे प्रकार सत्ताधारी करत असतात असं म्हटलं जातंय.
चित्यानां 5* सुविधा आणि खेळाडूंना टाॅयलेट मध्ये जेवण का..?? उप्र मधील सराहाणपूर येथील घटना @BhatkhalkarA @ChitraKWagh यावर आपली प्रतिक्रिया येणार का..??@AUThackeray @AhirsachinAhir pic.twitter.com/ldY2s8EnvP
— Shilpa Bodkhe – प्रा.शिल्पा बोडखे (@BodkheShilpa) September 20, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Viral Video of Uttar Pradesh Saharanpur players food found kept in the toilet room check details 20 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं