अयोध्येत येऊन तीच लोकं पुन्हा वातावरण बिघडवू पाहात आहेत

अयोध्या : २५ नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अयोध्येत सभा आणि दुसरीकडे त्याच दिवशी आरएसएस’ने सुद्धा सभा आयोजित करण्याच्या घोषणा केल्या आहेत. ६ डिसेंबर १९९२च्या त्या घटनेतील हिंदू आणि मुस्लिम समाजातील पीडितांच्या जखमा आजही ताज्या असताना केवळ आगामी निवडणुकीच्या तोंडावर धार्मिक फायदा करून घेण्यासाठी सत्ताधारी पुढे सरसावले आहेत. दरम्यान, २५ नोव्हेंबरच्या पूर्व नियोजित कार्यक्रमांमुळे स्थानिकांनी पुन्हा भीती व्यक्त केली आहे.
अयोध्येतील मुस्लीम जनतेत पुन्हा भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे. या दिवशी तेथे पुन्हा जनसमुदाय जमून काही अघटित घडण्याची भीती स्थानिक लोकांनी व्यक्त केली आहे. राजकीय पक्ष येथे जनसमुदाय जमवून काही प्रक्षोभक वक्तव्य करतील आणि पुन्हा तीच जुनी परिस्थिती उभी राहील अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. ६ डिसेंबर १९९२ या दिवशी जेव्हा बाबरी पाडली गेली, तेव्हा स्थानिक मुस्लिम लोकांच्या घरांची मोठ्याप्रमाणावर तोडफोड करण्यात आली होती, अशी आठवण रामजन्मभूमी वादातील याचिकाकर्ते इकबाल अन्सारी यांनी प्रसार माध्यमांना करून दिली आहे.
येथे मोठा जनसमुदाय जमल्यास होणारे नुकसान कोणीही रोखू शकणार नाही. त्यामुळे त्याआधीच आमच्याकडे गाव सोडून जाण्यापलीकडे पर्याय नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. राजकारणी लोकं केवळ निवडणुकीच्या कारणाने पुन्हा देशातील वातावरण बिघडविण्याचे काम करत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं