फेसबुकला टक्कर देण्यासाठी गुगल लाँच करणार 'Shoelace'?

नवी दिल्ली : सध्या वर्चुअल सोशल कनेक्टच्या बाबतीत जवळपास सर्वच जग फेसबुक आणि गुगलशी संबंधित आहे. मात्र या दोन जागतिक स्तरावरील दिग्गज ब्रँडमध्ये स्पर्धा देखील तेवढीच तीव्र असल्याचं नेहमीच निदर्शनास आलं आहे. काही महिन्यांपूर्वीच गुगलने त्यांचं गुगल-प्लस हा सोशल कनेक्ट प्लॅटफॉर्म बंद करण्याचा निर्णर घेतला होता. कारण फेसबुकच्या तुलनेत त्याला अत्यंत अप्ल प्रतिसाद मिळत असल्याचं निदर्शनास आलं होतं.
त्यामुळे पुन्हा गुगल पूर्ण तयारीनिशी गुगल आपल्या युजर्ससाठी नवीन अपडेट सोशल कनेक्ट प्लँटफॉर्म घेऊन येणार आहे. यावेळी गुगलने ‘Shoelace’ अँप आणण्यासाठी सज्ज झालं आहे. ‘Shoelace’ गुगलचा सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. मागील काही दिवसांपूर्वी गुगलने आपले जुने सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म Google+ अनेक कारणांमुळे बंद केले. त्यामुळे गूगल आपल्या युजर्संना नवीन ‘Shoelace’ सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आणण्याची शक्यता आहे. फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मच्या तुलनेत Google+ ला म्हणाला तितका प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गुगलने Google+ बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
‘Shoelace’ च्या माध्यमातून गुगल पुन्हा एकदा सोशल नेटवर्किंग स्पेसमध्ये आपली पकड तंगडी करण्यासाठी आणि फेसबुकला मोठं आवाहन देण्यासाठी तयात झालं आहे. यापूर्वी Google+ या गुगलच्या फ्रेन्ड कनेक्ट आणि गुगल बजला देखील युजर्सकडून अल्प प्रतिसाद मिळाला होता. ३ महिन्यांपूर्वी Google+ कायमस्वरूपी बंद केल्यानंतर पुन्हा ‘Shoelace’ च्या माध्यमातून गुगल सोशल नेटवर्किंगमध्ये दमदार एन्ट्री करण्याच्या प्रयत्नात आहे. ‘Shoelace’ च्या नावानुसार असे समजते की, गुगलचे हे सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लोकांना फेसबुकप्रमाणे एकत्र आणण्याचे काम करेल.
गुगल आपल्या ‘Shoelace’ या सर्व्हिसमधून युजर्सच्या सोशल लाईफला सुपरचार्ज करु पाहत आहे. यासाठी ‘Shoelace’ च्या माध्यमातून एकसारख्या विचारधारेच्या व्यक्तींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेल. यासाठी ‘Shoelace’ युजर्सच्या पसंतीला नक्कीच उतरेल अशी आशा आहे. अँपमध्ये दिलेल्या ‘लूप’ मधून युजर्स इव्हेंट आणि ऍक्टिव्हिटीचा प्लॅन करु शकतात. तसेच, यामध्ये भाग घेऊ शकतात. त्यामुळे ‘Shoelace’ ला हायपरलोकल अँप सुद्धा म्हटले जाऊ शकते, जसे की फेसबुक इव्हेंट सारखे. गुगलचे हे फीचर अशा लोकांच्या कामी येईल की, जे नवीन शहरात आले आहेत आणि त्या शहराबद्दल माहिती जाणून घेणार आहेत.
सदर प्रॉडक्ट गुगलच्या वर्कशॉप ‘एरिया १२०’ द्वारे तयार करण्यात आले आहे. ज्याचा मुख्य उद्देश रियल-वर्ल्ड कनेक्शन आहे. दुसऱ्या सोशल नेटवर्क्सच्या तुलनेत गुगल याला लहान स्तरावर लॉन्च करणार आहे. सध्या गुगल ला न्यूयॉर्कमध्ये टेस्ट केले जाणार आहे. यशस्वी टेस्टिंगनंतर याला अन्य शहरात लॉन्च करण्यात येईल. ‘Shoelace’ अँप अँड्रॉइड आणि आयओएसवर सिस्टिमवर चालणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं