सारथी: खासदार संभाजीराजेंचं उपोषण अखेर मागे; सरकारकडून शिंदेंची मध्यस्ती

पुणे : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सारथी संस्था वाचवण्यासाठी सुरु केलेलं लाक्षणिक उपोषण मागे घेतलं आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी संभाजीराजेंची भेट घेऊन, सारथी संस्थेची स्वायत्तता अबाधित राहील असं आश्वासन दिलं. त्यानंतर संभाजीराजेंनी हे उपोषण मागे घेतलं. “आमच्या सर्व मागन्या मान्य झाल्यामुळे आम्ही हे आंदोलन मागे घेत आहोत”, असे संभाजीराजे म्हणाले आहेत.
माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात सारथी संदर्भात उपोषण आंदोलन सुरू होतं. सारथी या संस्थेच्याबाबत जी स्वायतत्ता आहे, ती कायम राहिली पाहिजे, जे.पी.गुप्ता या अधिकाऱ्याने सारथी संस्थेत हस्तक्षेप करता कामा नये, संस्थेला कुठेही निधीमध्ये किंबहूना जे काही अधिकार स्वायत्ततेचे आहेत ते कायम राहिले पाहिजे, परिहार यांनी दिलेला राजीनामा स्वीकारला जाऊ नये अशाप्रकारच्या मागण्या करण्यात आल्या होत्या.
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्वायत्तता अबाधित ठेवावी, यांसह विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांनी आगरकर रस्त्यावरच ठिय्या देत लाक्षणिक उपोषण सुरू केले होतं. या वेळी सारथीला मोठ्या प्रमाणात निधी द्या, प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांच्यावर कारवाई करा, असे फलकही आंदोलकांनी झळकविले होते.
यावेळी शिंदे यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :
- सारथीची स्वायत्तता कायम राहणार
- व्यवस्थापकीय संचालक डी. आर. परिहार यांचा राजीनामा सरकार स्वीकारणार नाही.
- सारथीच्या पुढील वाटचालीसाठीच्या निर्णय प्रक्रियेत छत्रपती संभाजीराजे यांना सहभागी करून घेणार.
Web Title: MP Chhatrapati Sambhaji Maharajs protest cancelled after promise of CM Uddhav Thackeray.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं