Special Recipe | ब्राम्हण पद्धतीची डाळिंबी उसळ घरी करून पहा

मुंबई ४ मे : डाळिंबी उसळ म्हणजे वालाची उसळ. ही कडव्या वेळापासून बनवली कि अतिशय उत्तम लागते . ब्राह्मणी लोक मुंज,लग्न,डोहाळे जेवण आणि इतर काही सण समारंभात आवर्जून बनवतात. तीच डाळिंबी उसळ पण वेगळ्या पद्धतीची आम्ही बनवली आहे तिची पाककृती खालीलप्रमाणे
साहित्य:
२ वाटया डाळींब्या (वाल )
१ मोठा बारीक चिरलेला कांदा
१ टेबल स्पून हिरवे वाटण ( १” आले ,४-५ लसूण पाकळ्या २-३ मिरच्या आणि कोथिंबीर )
१ टी हळद
१ टेबल स्पून मालवणी मसाला
अर्धी वाटी किसलेले ओले खोबरे
२-३ टी स्पून चिंचेचा कोळ
फोडणीचं साहित्य ( मोहरी,जिरे,हिंग आणि कडीपत्ता )
चवीपुरतं मीठ आणि सजावटीसाठी कोथिंबीर
कृती :
१) वाल कोमट पाण्यात १० ते १२ तास भिजत ठेवावे. नंतर पाणी काढून टाकून भिजलेले वाल मोड आणण्यासाठी पंच्यात ८ ते १० तास गच्च बांधून ठेवावे. डाळींब्यांना मोड आले कि कोमट पाण्यात १० मिनीटे टाकून ठेवावे. डाळींब्या सोलून घ्याव्यात. मोड आलेल्या डाळींब्या हाताळताना त्या अख्ख्या राहतील याची काळजी घ्यावी. साधारण सव्वा ते दोन वाटया डाळींब्या होतील.
२) कढईत तेल गरम करावे. त्यात फोडणीचं साहित्य घालावे. त्यात कांदा गुलाबी होईपर्यंत परतावा . त्यानंतर त्यात हिरवे वाटण घालावे. ते तेलात परतल्यावर त्यात हळद, मसाला घालावा. भिजलेले वाल घालावे. बेताचे पाणी घालून शिजत ठेवावे . वाल शिजत आले की त्यात चिंचेचा कोळ,
मीठ आणि किसलेला खोबरे घालावे. आणि वरून कोथिंबीर पेरावी .
ही उसळ गरमागरम पोळ्यांबरोबर सर्व्ह करावी .
News English Summary: Dalimbi Usal is made by field beans. Brahmins makes it in occasion o Munj, wedding, Dohale meal and some other festivals. The recipe for the same is different but we have made it in a different way
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं