महत्वाच्या बातम्या
-
युपी निवडणुक २०२२ | मुस्लिमांनी भारतात राहू नये असे जो म्हणतो तो हिंदू नाही - मोहन भागवत
देशात इस्लाम धोक्यात आहे या भीतीच्या जाळ्यात फसू नका, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिमांना केले. ते म्हणाले, ‘हिंदू-मुस्लिम एकतेला वेगळे वळण लावले जात आहे, पण दोन्ही वेगवेगळे नाहीत, तर एकच आहेत. सर्व भारतीयांचा डीएनए एक आहे, भलेही ते कोणत्याही धर्माचे असोत. आपण लोकशाहीत राहतो. येथे हिंदू किंवा मुस्लिमांचे प्रभुत्व राहू शकत नाही, फक्त भारतीयांचे प्रभुत्व असू शकते. मुस्लिमांनी भारतात राहू नये असे जो म्हणतो तो हिंदू असू शकत नाही.’ भागवत रविवारी मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या ‘हिंदुस्तानी पहले, हिंदुस्तान पहले’ कार्यक्रमाला संबोधित करत होते.
4 वर्षांपूर्वी -
आगामी युपी निवडणुका | भाजपने तंत्र बदललं, समाजवादी ऐवजी MIM'वर प्रतिक्रिया आणि विधानं करण्याचं?
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूक जवळ आल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे, कोरोना आपत्तीत भारतीय जनता पक्षाची आणि योगींची नाचक्की झाल्याने पक्षावर मोठं राजकीय संकट ओढवलं आहे. त्यात समाजवादी पक्ष मोठी मजल मारण्याची शक्यता निर्माण झाली असून त्याचे संकेत यूपीतील पंचायत निवडणुकीत आले होते आणि परिणामी भाजपकडे मतविभागणी हाच पर्याय शिल्लक असल्याचं पाहायला मिळतंय. त्यासाठी थेट समाजवादी पक्ष किंवा अखिलेश यादव यांना दुर्लक्षित किंवा त्यांच्यावर थेट हल्ला न करता एमआयएम प्रतिस्पर्धी असल्याचा भास निर्माण करण्याचं अस्त्र सध्या भाजपने उपसल्याच पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
भाजपचं 'जनाब' राजकारण फसलं | उत्तर प्रदेश धर्मांतर रॅकेट | अटक झालेल्या आरोपीचं मोदींनी कौतुक केलेलं
उत्तर प्रदेशातील बेकायदा धर्मांतर रॅकेटप्रकरणी बीड जिल्ह्यातील सिरसाळा (ता. परळी) गावचा तरुण इरफान खान ख्वाजा खान पठाण याला सोमवारी उत्तर प्रदेश एटीएस पथकाने दिल्लीत अटक केली. इरफान हा केंद्रीय महिला आणि बालकल्याण विभागात मूकबधिर मुलांसाठी सांकेतिक संवाद दुभाषा तज्ज्ञ म्हणून काम करतो.
4 वर्षांपूर्वी -
एमआयएम'ची भूमिका भाजपच्या फायद्याची? | उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत १०० जागा लढवणार
उत्तर प्रदेशमध्ये २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आल्याचं दिसत आहे. आजच बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी स्वबळचा नारा देत, एमआयएम सोबतच्या आघाडीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर आता एमआयएम कडून देखील या निवडणुकीच्या संदर्भात घोषणा करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेशच्या निवडणुका जवळ आल्या | पंतप्रधान मोदींना आठवलं 'अयोध्या विकास मॉडेल'
अयोध्याच्या विकासासाठी बनवलेल्या व्हिजन डॉक्युमेंट्सबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक व्हर्च्युअल पद्धतीने घेण्यात आली असून सुमारे 45 मिनिटे चालली. या बैठकमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दोन्ही उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि दिनेश शर्मा यांच्यासह 13 लोक उपस्थित होते. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या बैठकीमध्ये ट्रस्टच्या कोणत्याचा संदस्यांना बोलावले नसल्याचे सांगितले जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेशची जनता भाजपला कंटाळली | याचा परिणाम राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळेल
आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओमप्रकाश राजभर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, भारतीय जनता पक्षासोबत युती करणार नाही. तसचे एनडीए मध्ये सहभागी होणार नसल्याचे यापूर्वीच म्हटले होते. यानंतर आता ओमप्रकाश राजभर यांनी अजब दावा करत पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. जर उत्तर प्रदेशमध्ये आमच्या पक्षाचे सरकार आले, तर ते वेगवेगळ्या जातीच्या नेत्यांना संधी देण्यात येईल. ५ वर्षांत पाच मुख्यमंत्री आणि प्रत्येक वर्षांत चार उपमुख्यमंत्री बनवले जातील, असे म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ | भाजपमध्ये योगी आदित्यनाथ यांना पर्यायी चेहऱ्याचा शोध
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आगामी लोकसभेसाठी त्यांनी विरोधकांची मुठ बांधणे सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर पवारांनी सोमवारी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली आणि त्यानंतर मंगळवारी दुपारी 4 वाजता ‘राष्ट्र मंच’ची बैठक बोलावली आहे. मोदी सरकारच्या विरोधात 2018 मध्ये यशवंत सिन्हा यांनी राष्ट्र मंचची सुरुवात केली होती.
4 वर्षांपूर्वी -
इंद्रदेव वाराणसीत अतिवृष्टी करून बदनामी करण्याचे षडयंत्र रचत आहेत | त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल व्हायला हवेत
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये अब्दुल समद नावाच्या एका वृद्ध व्यक्तीवर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी ट्विटरसह 9 जणांवर एफआयआर दाखल केली होती. या घटनेला चुकीच्या पद्धतीने जातीय रंग दिल्यामुळे या सर्वांवर ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका वयोवृद्ध मुस्लिमांना मारहाण करत दाढी कापण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
प्रॉपर्टी डीलरों के सम्मान में, भक्त मंडली मैदान में | भाजप समर्थकांची खिल्ली
राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेना विरुद्ध भाजप असे चित्र मुंबईत पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तुफान राडा झाला आहे. शिवसेना भवनसमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली. राम मंदिरावरुन शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीकेमुळे हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान हाणामारीमुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सरकारने श्रीराम जन्मभूमी ट्रस्टवर भ्रष्टाचारी लोकं घेतले | कोण चंपत राय?, कधी नावही ऐकले नव्हते - शंकराचार्य
श्रीराम जन्मभूमि मंदिर निर्मिती ट्रस्टवर लागलेल्या आरोपांवरून आता शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे प्रतिक्रिया समोर आली आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय बेजबाबदार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना त्वरीत पदावरून दूर करावे असे शंकराचार्य म्हणाले आहेत. द्विपीठाधीश्वर जगदगुरूंनी नरसिंहपूर जिल्ह्यातील परमहंसी गंगा आश्रमात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राम मंदिर ट्रस्टवरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश | निवडणुकीत योगी नव्हे तर अखिलेश यांची हवा | बसपाचे ९ आमदार भेटीला
उत्तर प्रदेशमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. बहुजन समाज पार्टीच्या ९ बंडखोर आमदारांनी आज समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. बसपाचे हे सर्व आमदार आज सकाळी ११ वाजता थेट लखनऊ येथील समाजवादी पार्टीच्या मुख्यालयात पोहचले आणि त्यांनी अखिलेश यादव यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | यूपीत धार्मिक षडयंत्र? | मुस्लिम वृद्धाला मारहाण, दाढी कापली, जय श्री राम बोलायला लावलं
उत्तर प्रदेशाच्या निवडणुका जवळ आल्याने यूपीतील धार्मिक तेढ वाढविण्यास काही विकृतांनी सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. उत्तर प्रदेशाच्या गाझियाबादमध्ये अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. काही तरुणांनी एका वृद्ध मुस्लीम व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना ‘जय श्री राम’ बोलण्याची सक्ती देखील केली आहे. जबरदस्तीने त्यांना जय श्री राम बोलायला लावलं. या घटनेचा एक व्हिडीओ देखील समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हि़डीओमध्ये काही तरुण वृद्ध व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
५ मिनिटांपूर्वी २ कोटीत विकलेली जमीन ट्रस्टने १८.५ कोटीला खरेदी केली | श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टवर भ्रष्टाचाराचा आरोप
अयोध्येत राममंदिराची उभारणी करत असलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राने जमीन खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप ‘आप’ नेते संजय सिंह आणि सपाचे नेते पवन पांडेय यांनी केला आहे. पाच मिनिटांपूर्वी जी जमीन दोन कोटीत विकली गेली तीच जमीन ट्रस्टने १८.५ कोटी रुपयांत खरेदी केली, असा आरोप करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
का आखली जातेय युपीच्या विभाजनाची योजना? | भाजप आणि योगींना निवडणुकीपूर्वी कोणती भीती ? - वाचा सविस्तर
पुढच्या वर्षी म्हणजे उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या महत्वाच्या बैठकांना वेग आला आहे. महत्वाचं म्हणजे उत्तर प्रदेश भारतीय जनता पक्षात तत्पूर्वी वादळ आल्याची चर्चा रंगली आहे. सध्याच्या स्थितीला तरी भाजप आगामी उत्तर प्रदेशात पायउतार होणार अशीच राजकीय स्थिती असल्याचं राजकीय विश्लेषक आणि स्थानिक पत्रकार सांगत आहे. परिणामी आरएसएस आणि भाजपमध्ये जोरदार धावपळ सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे त्याहून अधिक घडामोडी विरोधकांच्या गोटात देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे भेदरलेली भाजप सध्या उत्तर प्रदेशाचेच दोन तिकडे करण्याची योजना आखात असल्याचं वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
वाढदिवसाला त्यांनी केक जास्त खाल्ला असेल | पिंजऱ्याचं दार उघडं ठेवतो आतमध्ये येऊनच दाखवा - संजय राऊत
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आपल्या वाढदिवशी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी वाकयुद्ध रंगले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी संजय राऊत यांनी पाटील यांची पुन्हा फिरकी घेतली. काल त्यांचा वाढदिवस होता, त्यांनी जास्त केक खाल्ला असेल. त्यांना फारसे गांभीर्याने घेऊ नका असे राऊत म्हणाले. ते नंदुरबारमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश निवडणूक | सहकारी पक्षांनाही पराभवाचे संकेत मिळाले? | म्हणाले भाजप म्हणजे ‘डूबती नैया’
उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षासोबत इतर स्थानिक पक्ष देखील कामाला लागले आहेत. मात्र सध्या कोरोना आपत्ती सारख्या विषयांमुळे यूपीत भाजपाला आणि आरएसएसला पराभवीचे संकेत मिळाल्याने सतर्कता बाळगण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी छोट्या जुन्या सहकारी पक्षांना सोबत घेण्यासाठी सुरुवात झाली आहे. परंतु त्यांना देखील भाजपच्या पराभवाचे संकेत मिळत आहेत का अशी चर्चा रंगली आहे.
4 वर्षांपूर्वी -
युपी विधानसभा निवडणुकीपूर्वी यूपीचे विभाजन? पूर्वांचल राज्याची स्थापना हेच दिल्ली वारीचं कारण ? - सविस्तर वृत्त
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. तत्पूर्वी, योगी गुरुवारी अचानक दिल्लीला पोहोचले आणि त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे दीड तास चालली. आता त्यांची पंतप्रधानांशीही बैठक होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
योगी सर्वांना सोबत घेण्यात मागे पडत आहे | खासदार, आमदारांचीही तक्रार | आज योगी दिल्लीत
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. तत्पूर्वी, योगी गुरुवारी अचानक दिल्लीला पोहोचले आणि त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे दीड तास चालली. आता त्यांची पंतप्रधानांशीही बैठक होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
योगीना पर्यायी नेतृत्व उभं करण्याच्या हालचाली? | ‘नमामि गंगे’च्या पोस्टरवरूनही मोदी-शहा बाजूला
उत्तर प्रदेशात कोरोना आपत्तीत झालेल्या नाचक्कीमुळे मोदींना देखील लोकसभा निवडणूक महागात पडणार असल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत. देशभरापासून ते जगभर उत्तर प्रदेशातील घटनांमुळे भाजपवर टीका झाली आहे. त्यामुळे दिल्लीतील नैतृत्व योगींवर प्रचंड नाराज आहेत. अगदी फोटोवर देखील योगींपासून अंतर राखण्यास सुरुवात झाली आहे. तसेच उत्तर प्रदेशात ‘ब्राह्मण’ राजकारणाला देखील सुरुवात झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचे प. बंगालचे प्रभारी जितिन प्रसाद यांचा काँग्रेसला प. बंगालमध्ये शून्य केल्यानंतर युपी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश
युपीए-२ च्या काळात केंद्रात मंत्रीपदी राहिलेले उत्तर प्रदेशमधील वरीष्ठ नेते जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीमधील भाजपाच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसमधील एक महत्त्वाचा चेहरा आणि प्रमुख नेताच भाजपानं गळाला लावल्यामुळे भाजपने देखील मोठा गाजावाजा केल्याचं पाहायला मिळतंय. पण खरं वास्तव दुसरंच आहे.
4 वर्षांपूर्वी