महत्वाच्या बातम्या
-
माणसाकडे माणूस म्हणून न पाहता ‘वस्तू’ म्हणून बघितलं जाऊ लागल्याने ते घडतं आहे
नंदोरी मार्गावरील एका दुकानासमोर एका माथेफिरुने तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना काल घडली. ही तरुणी मातोश्री कुणावार महिला कॉलेजमध्ये बॉटनी या विषयाची प्राध्यापिका होती, ती काल नंदोरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना एक युवक पाठीमागून दुचाकी वर आला, त्याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. स्वतःच्या गाडीतील पेट्रोल काढले आणि त्याने सोबत कपडा गुंडाळलेला टेंभा आणला होता, त्याने मुलीच्या पाठीमागे जाऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि पेटवलेला टेंभा तिच्या अंगावर फेकून तिथून पळ काढला.
5 वर्षांपूर्वी -
यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपला धक्का, शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी
यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला धक्का बसला आहे. शिवसेनेच्या तिकीटावर रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी विजयी झाले आहेत, तर भारतीय जनता पक्षाच्या सुमित बाजोरिया यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
5 वर्षांपूर्वी -
यवतमाळ: पंचायत समितीच्या सभापती निवडीवरून सेना-भाजप नेत्यांमध्ये राडा
यवतमाळ पंचायत समिती सभापती निवडीवरून बुधवारी शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये राडा झाला. पंचायत समिती कार्यालयात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाची महाविकास आघाडी आहे. यवतमाळ पंचायत समिती सभापती उपसभापती पदासाठी आज निवडणूक होती.
5 वर्षांपूर्वी -
कितीही चिखल केला तरी देखील कुठेही कमळ फुलू देणार नाही: आ. आदित्य ठाकरे
शिवसेनेचे युवा नेते आणि पहिल्यांदाच आमदार बनलेले आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. कितीही चिखल केला गेला असला तरी देखील आम्ही कुठेही कमळ फुलू देणार नाही, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे नाव न घेता आदित्य ठाकरे यांनी टोला हाणला आहे आणि त्यांच्या बोलण्याचा संपूर्ण रोख हा भाजपवर होता हे स्पष्ट होतं. सत्ताच्या लोभापोटी मित्राना कसे डावलले जाते हे आपण पाहिले असल्याचेही ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
आ.बच्चू कडूंच्या प्रयत्नाने अमरावती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना हक्काचं वाहन मिळालं
राज्यातील प्रशासकीय पातळीवरील लोकहिताच्या कामांची जवाबदारी जरी जिल्ह्यातील निरनिराळ्या सरकारी खात्यांवर असली तरी, आजची अनेक सरकारी खातीच सुविधां अभावी सामान्य लोकांची कामं वेळेवर मार्गी लावू शकत नाहीत. मात्र स्थानिक लोक प्रतिनिधी जर जागृत असतील तर त्यावर देखील मात करता येणं शक्य असल्याचं अमरावतीमध्ये पाहायला मिळालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सध्या तरी 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' इतकंच माझ्या डोक्यात: शरद पवार
शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी थेट शेताच्या बांधावर गेलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नागपुरातच ‘मी पुन्हा येईन’वरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. सध्या तरी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ इतकंच माझ्या डोक्यात आहे, असं ते म्हणाले. मध्यावधी होण्याचा प्रश्नच नाही. हे सरकार स्थापन होणार असून, ते पाच वर्षे चालणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
6 वर्षांपूर्वी -
संजय राऊत हे शिवसेनेचे पोपट; उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर अंकुश ठेवावा: आ. रवी राणा
सध्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेवरून कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तब्बल दहा दिवस उलटले असले तरी अजून पर्यंत सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. त्यात नक्की युतीचं सरकार स्थापन होणार की आघाडीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार याबद्दल देखील राजकीय अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेत लवकरच फूट पडेल; २०-२५ आमदार फडणवीसांच्या संपर्कात: आ. रवी राणा
सध्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेवरून कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तब्बल दहा दिवस उलटले असले तरी अजून पर्यंत सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. त्यात नक्की युतीचं सरकार स्थापन होणार की आघाडीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार याबद्दल देखील राजकीय अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांनी २०१४साली शपथपत्रात लपवलेल्या २ गुन्हे प्रकरणांची नोंद २०१९च्या शपथपत्रात
दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील नोंदीनुसार मागील पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांची संपत्ती ही तब्बल १०७ टक्क्यांनी वाढली आहे. त्यांच्या नावावर चार प्रलंबित प्रकरणांची नोंद देखील दाखविण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
अर्थमंत्र्यांची पत्नी विश्वस्त पदी; तिरुपती देवस्थानला २०० कोटींचा भूखंड १ रुपया दराने; सरकारचा पराक्रम
श्रीमंत तिरुपती देवस्थानाला मुंबईतली कोट्यवधींची जमीन एक रुपया भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. देवस्थानाच्या मागणीनुसार मुंबईतील वांद्रे उपनगरातील शासकीय जमीन 30 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यास ८ ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आपल्या पत्नीचे विश्वस्त पद कायम राहावे म्हणून राज्याच्या अर्थमंत्र्यांनी ८० कोटी किंमत असणारी सरकारी जमीन तिरुपती देवस्थान ट्रस्टला चक्क १ रुपया या कवडीमोल भावाने दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कामासाठी पारदर्शकतेचा कायम पुरस्कार करणा-या मुख्यमंत्र्यांनीही पाठिंबा दिल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या जमिनीचे बाजारमूल्य दोनशे कोटी आहे.
6 वर्षांपूर्वी -
यवतमाळ अपहरणनाट्य: मास्टरमाईंड भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचे गृहमंत्र्यासोबत फोटो
व्यावसायिकाच्या मुलाचं अपहरण करून ५० लाखाच्या खंडणीची मागणी करणाऱ्या अपहरणकर्त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचा देखील समावेश असून शुभम टोलवानी असं त्याचं नाव आहे. क्रिकेटच्या सट्ट्यात पैसे हरल्यामुळे त्याने व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून पैसे कमावण्याचा शॉर्टकट स्वीकारला होता आणि त्यात पुरता फसला आहे.
6 वर्षांपूर्वी -
अमरावती शिवसेनेतील वाद विकोपाला; मातोश्रीवर बैठका
माजी खासदार अनंत गुढे आणि शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांच्यातील वाद विकोपाला पेटला आहे. गुढे यांची पक्षातून हकालपट्टी करा असे आवाहन अडसूळ यांनी पक्षप्रमुखांना केले. या पार्श्वभुमीवर अनंत गुढे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मी माझे म्हणणे पक्षप्रमुखांसमोर मांडल्याचे ते म्हणाले. शिवसेना माझी आई आहे तर मातोश्री हे मंदिर आहे. निवडणुकीपूर्वी महाशिवरात्रीला स्मशानभूमीत झालेल्या सर्वपक्षीय कार्यक्रमाचा तो व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओने कोणी दुखावले असेल तर मी माफी मागतो असे गुढे म्हणाले. माझ्या हकालपट्टीच्या मागणीबद्दल उद्धव ठाकरे निर्णय घेतील असेही ते म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
नागपूर विद्यापीठात आता शिकविणार आरएसएस'चा इतिहास
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आता आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. देशाच्या उभारणीत संघाचे स्थान यावर विद्यार्थ्यांना ‘बीए’(इतिहास)च्या चौथ्या सत्रात सदर विषयाला अनुसरून धडे शिकविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत त्या जागेवर ‘कम्युनॅलिझम’चा विकास या मुद्याला स्थान होते. मात्र नागपूर संघाचे मुख्यालय असून आणि मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत बहुमताने वीजमं होताच, पहिल्यांदाच अशा प्रकारचा बदल झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पोटनिवडणूक: चंद्रपूर नगरपरिषदेत काँग्रेसचा भाजपाला दणका; पुण्यात भाजपचा आयात उमेदवार विजयी
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. मूल नगर परिषद पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला असून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार शिल्पा रामटेके यांचा काँग्रेस उमेदवार ललिता फुलझेले यांनी एकूण १७६ मतांनी पराभव केला आहे. वॉर्ड क्रमांक ६ मध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अपात्र झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली होती.
6 वर्षांपूर्वी -
राज्यात पाणीबाणी! धरणांमध्ये केवळ ७.७ टक्के पाणीसाठाच शिल्लक
महाराष्ट्रात भीषण पाणीसंकट ओढावलं आहे. मान्सून येत्या २ दिवसांत केरळमध्ये दाखल होणार असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. परंतु महाराष्ट्रात मान्सूनची हजेरी लागण्यास अद्याप वेळ आहे. अशातच राज्यातील धरणांमध्ये केवळ ७.७ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने महाराष्ट्राला येत्या काळात मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची बाब समोर आली आहे. मागील वर्षी यावेळी राज्यातील धरणांमध्ये १८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता तर मराठवाड्यात १४ टक्के पाणीसाठा होता परंतु या वर्षी मराठवाड्यात केवळ ०.७ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.
6 वर्षांपूर्वी -
...तर अडसूळ आजोबांचे निश्चितच आशिर्वाद घेऊ: नवनीत राणा-कौर
बुजुर्गांनी लोकसभा निवडणूक लढवायला नको असा सल्ला निवडणुकीपूर्वी देणाऱ्या अमरावतीतून जिंकलेल्या नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचे नक्कीच आशिर्वाद देखील घेऊ असे सांगितले. एका खासजी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हे भाष्य केलं आहे, कारण आनंदराव अडसूळ माझ्या आजोबांच्या वयाचे आहेत. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या तर नक्कीच मी नक्कीच स्वीकारेन आणि मोठ्या मनाने अडसूळ आजोबांचे आशिर्वाद घ्यायला त्यांच्या घरी जाईन.
6 वर्षांपूर्वी -
सेनेचे सर्व मंत्री बिनकामाचे असा आरोप करणाऱ्या सेना आमदाराने राज्य काँग्रेसमुक्त होऊ दिलं नाही
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आघाडीची पुरती धूळदाण झाली आहे. राष्ट्रवादीने ५ तरी जागा जिंकल्या आहेत, मात्र काँग्रेस पक्ष केवळ एका जागेवर शिल्लक राहिला आहे आणि ती जागा आहे चंद्रपूरची जिथे भाजपचे हंसराज अहिर पराभूत झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमुक्त होण्यापासून थोडक्यात वाचला आहे.
6 वर्षांपूर्वी -
नागपूर लोकसभा: नितीन गडकरी विजयी; काँग्रेसच्या नाना पटोलेंचा दारुण पराभव
लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. भाजपच्या नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या नाना पटोले यांना अगदी सहज झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भाजपकडून दुसऱ्यांदा उमेदवारी घेणारे नितीन गडकरी आता पुढील ५ वर्ष या मतदारसंघाचे खासदार असतील हे निश्चित झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत नक्षलींचा हिंसाचार, १५ जवान शहीद
गडचिरोलीतील दादापूर येथे तब्बल ३६ वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षलवाद्यांनी बुधवारी कुरखेड्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ मोठा भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात तब्बल १५ जवान शहीद झाले असून या घटनेने महाराष्ट्र दिनी समस्त पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.
6 वर्षांपूर्वी -
ताडोबा वाघ्र प्रकल्पात वाघाचा मृत्यू
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या खातोडा गेट परिसरात वाघाचा मृत्यू झाला आहे. वाघच्या मृत्यूची माहिती कळताच वनविभागाचं पथक घटनास्थळी रवाना झालं आहे. वाघाच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, चंद्रपूरचे तापमान दिवसागणिक वाढत आहे. दुपारी रस्तेही ओस पडत आहेत, मात्र पर्यटकांनी वाघोबाच्या दर्शनासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात गर्दी केली आहे. उष्माघातामुळे वाघच्या मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी