महत्वाच्या बातम्या
-
कोकणासह घाट परिसरात पावसाचा जोर वाढला | पुढील 5 दिवस पुण्यालाही ऑरेंज अलर्ट
मागील आठवड्यात राज्यात झालेल्या मुसळधार पावसानं पिकांचं मोठं नुकसान केलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. दुसरीकडे मात्र काही भागात झालेला पाऊस शेतकऱ्यांसाठी सुखावणारा ठरला. राज्यात सध्या अनेक ठिकाणी हलक्या सरी पडत आहे. आज सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे परिसरात हलक्या पाऊस कोसळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Alert | सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा | हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ सप्टेंबर आणि ८ सप्टेंबर रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबतचा इशारा मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. गणपती उत्सवासाठी कोकणात याच काळात शेकडोंच्या संख्येने चाकरमानी मुंबई आणि अन्य भागातून जाणार आहेत. त्यामुळे त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
4 वर्षांपूर्वी -
चाकरमानी कोकणात निघाला | तिकडे दापोलीसहित अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात
दापोलीत रात्रभर मुसळधार पाऊस झाला असून शहरातील विविध ठिकाणी आणि मुख्य रस्त्यांवर पाणी साचलं आहे. दापोलीतीलकेळकर नाका, शिवाजीनगर, भारत नगर, नागर गुडी, प्रभू आळी, जालगाव खलाटी या परिसरात सुमारे पाच फुटाने पावसाचे पाणी वाढल्याने अनेक घरांमध्ये हे पाणी शिरलेले आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि चिपळूण परिसरात एनडीआरएफचे २५ जवान आणि ४ बोटीसह पथक दाखल झालेले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Alert | येत्या चार दिवसांत महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या चार-पाच दिवसांत राज्यात अनेक भागांत विजांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
Rain Alert | पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा | पुढील ५ दिवस कुठं पाऊस पडणार?
प्रादेशिक हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजनुसार पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Mumbai Rain | मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज | या ठिकाणीही अंदाज
महाराष्ट्रात आज काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्यावतीनं हा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडतोय. उत्तर कोकणात ठाणे , पालघर आणि मुंबई मध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या शुभांगी भुते यांनी वर्तवला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Rain Updates | पाऊस पुन्हा सक्रिय होतोय | हवामान खात्याचा ‘या’ जिल्ह्यांना अॅलर्ट
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा पाऊस सक्रिय होत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात विदर्भासह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून बहुतांश जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाचे ज्येष्ठ अधिकारी के.एस.होसाळीकर यांनी राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल याची माहिती दिली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, पुणे जिल्ह्यातील घाट प्रदेश, सोलापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्रतवण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुढील ४८ तासांत या जिल्ह्यांत पावसांचा जोर वाढणार | या जिल्ह्यांसाठी अलर्ट
महाराष्ट्रात मागील आठवड्यात झालेल्या पावसाने पूर आला होता. अनेक जिल्ह्यात हाहाकार उडाला होता. मात्र, आता पावसाने विश्रांती घेतल्यानं पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह पुराच्या फटक्यातून सावरत असलेल्या जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं संकट ओढवण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
High Alert | मुंबईकरांसाठी हवामान खात्याकडून रेडअलर्ट | पुढील ३-४ तास धोक्याचे
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. आज सकाळपासून मुंबई आणि उपनगराच्या परिसरात वेगवान वाऱ्यांसह पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांमधील सततच्या पावसामुळे मिठी नदी सध्या तुडुंब भरून वाहत आहे. अशातच बुधवारी सकाळी 9 वाजून 56 मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस सुरुच राहिल्यास मुंबई पुन्हा एकदा जलमय होण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
High Alert | पुढचे 5-6 दिवस अतिमुसळधार पावसाचा IMDचा अंदाज
भारतीय हवामान विभागाच्या वतीनं हवामानाचा सुधारित अंदाज जारी करण्यात आला आहे. सुधारित अंदाजानुसार राज्यात पुढील ५ ते ६ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. शनिवारपासून राज्यातील अनेक भागात तुफान पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यानंतर आता भारतीय हवामान विभागानं पुढील पाच ते सहा दिवस राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Alert | राज्यांत 2-3 दिवस जोरदार पावसाचा अंदाज | अनेक ठिकाणी पूर, दरडी कोसळण्याचा धोका
देशात मान्सून अधूनमधून सक्रिय होत आहे. या पावसामुळे देशातील अनेक शहरांत कहर निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे, अनेक लोक या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे शहरातील अनेक भागात पाणीच पाणी साचले असून बस, ट्रेन आणि विमानाच्या उड्डाणावर याचा मोठा परिणाम झाला आहे. मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे दरड कोसळल्याने यामध्ये 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 5 घरेही कोसळली आहेत. बचाव कार्य वेगाने सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस आणि हायटाईड | दोन भूस्खलनांमध्ये 14 जणांचा मृत्यू
मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे शनिवारी रात्री उशिरा झालेल्या दोन भूस्खलनांमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 11 जणांचा चेंबूर भागात तर 3 जणांचा मृत्यू विक्रोळी येथे झाला. 16 लोकांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाच घरे कोसळली आहेत. दोन घरांचा ढिगारा काढण्यात आला असून तीन घरांचा मलबा काढणे सुरु आहे. घटनास्थळी उपस्थित एनडीआरएफ टीमचे बचाव कार्य सुरू आहे. पावसामुळे मदत कार्यात अडचणी येत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, रस्ते आणि रेल्वे वाहतूक प्रभावित
शहरात गुरूवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. शहर विभागापेक्षा उपनगरात पावसाचा जोर अधिक आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचले आहे. सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर तसेच रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Alert | पावसाने जोर पकडला, राज्यातील या भागात अतिवृष्टीचा इशारा - वाचा सविस्तर
मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनने चांगला जोर पकडला आहे. सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे १२ ते १५ जुलैदरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात अतिवृष्टी होईल, तर मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. रविवारी मुंबईसह लगतच्या परिसरात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती.
4 वर्षांपूर्वी -
Alert | राज्यात आजपासून मुसळधार | पुढील 4 दिवस याठिकाणी पाऊस
मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा कोसळायला सुरुवात केली आहे. आजपासून मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस सक्रीय होणार आहे. तर 10 जुलैपासून राज्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
Rain Updates | मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात धुवाँधार पाऊस | पुणे, सातारा, रत्नागिरीत रेड ॲलर्ट
राज्याभरात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात धुवाँधार पाऊस कोसळत आहे. तळकोकणाला पावसाने झोडपून काढलं आहे. तर कोल्हापुरात पंचगंगा नदी पात्राबाहेर केली आहे. येत्या 3 दिवसात कोकण, दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुणे, साताऱ्यासह, रत्नागिरीला रेड ॲलर्ट जारी करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत पुढील ४८ तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता | मागील ११ दिवसांतच पडला महिन्याभराचा पाऊस
मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राकडून आगामी ४८ तासांमध्ये मुंबई व उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची तसेच, काही ठिकाणी अतिमुसळधार पावासाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच, येत्या पाच दिवसात मुंबईसह कोंकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईकरांनो काळजी घ्या | हवामान विभागाकडून शहरात अतिवृष्टीचा इशारा
मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील ४ दिवसांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचा प्रत्यय मुंबईत पहायला मिळाला. सोमवारी रात्रीपासून मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र पहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी -
Rain Alert | मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा | सर्व यंत्रणा सज्ज
मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने या चार दिवसाच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस | 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
केरळ मधून द्रुतगतीने दोनच दिवसांत महाराष्ट्रात दाखल झालेल्या मोसमी पावसाची राज्यातील घोडदौड सुरूच असून, दोन दिवसांत त्याने ३० टक्के भाग व्यापला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांनंतर आता त्याने मराठवाडय़ातही प्रवेश केला आहे.
4 वर्षांपूर्वी