Whatsapp Updates | नवी पॉलिसी | सहमत नसाल तर व्हॉट्स बंद होणार

मुंबई, ६ जानेवारी: फेसबुकच्या मालकीचं व्हॉट्सअॅप नवीन वर्षात कात टाकतंय. येत्या 8 फ्रेबुवारी 2021 ला व्हॉट्स अॅप आपली सेवा, अटी तसंच गोपनियतेच्या धोरणात बदल करत आहे. व्हॉट्स अॅपच्या नव्या अटी आणि धोरणांशी सहमत नसाल तर तुमचं व्हॉट्स बंद होणार आहे.
व्हॉट्सअॅपचं नवं अटी आणि गोपनियता धोरण 8 फ्रेब्रुवारी 2021 पासून अंमलात येईल. या तारखेनंतर हे अॅप वापरु इच्छित असलेल्या युझर्सला नव्या अपडेटनुसार अटी आणि गोपनियता धोरणांना सहमती दर्शवावी लागेल. जर तुम्ही नव्या धोरणांना सहमती दर्शवली नाही तर तुम्हाला व्हॉट्स अॅप वापरता येणार नाही.
व्हॉट्सअॅपच्या नवीन अटींमध्ये नववर्षात युजर्सच्या डेटाचा वापर कशाप्रकारे केला जाईल याची माहिती देण्यात आली आहे. तसेच, युजर्सचा चॅटिंग डेटा कशाप्रकारे स्टोअर आणि मॅनेज केला जातो, याशिवाय फेसबुक बिजनेससाठी तुमची चॅट कशाप्रकारे मॅनेज केली जाईल याबाबतही माहिती देण्यात आली आहे. नव्या पॉलिसीमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामचं जास्त इंटीग्रेशन आहे. म्हणजे आता युजर्सचा आधीपेक्षा जास्त डेटा फेसबुककडे जाईल. व्हॉट्सअॅपचा डेटा आधीपासूनच फेसबुकला दिला जातो. पण आता फेसबुक आणि इस्टाग्रामवर इंटीग्रेशन जास्त होईल असं कंपनीने स्पष्ट केलंय.
News English Summary: WhatsApp owned by Facebook, is entering the new year. On February 8, 2021, WhatsApp is changing its service, terms and privacy policy. If you do not agree to the new terms and policies of the WhatsApp, your WhatsApp will be shut down. WhatsApp’s new terms and privacy policy will take effect on February 8, 2021.
News English Title: Whatsapp users must have to accept new privacy policy otherwise they will lose account news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं